अभिनेत्री आकांक्षा पुरी ही कायमच चर्चेत असते. आकांक्षा पुरी ही बिग बाॅस ओटीटी 2 मध्ये सहभागी झाली. मात्र, म्हणावा तसा धमाका बिग बाॅसच्या घरात करण्यात आकांक्षा पुरीला यश मिळाले नाही. हेच नाही तर एका टास्कमध्ये चक्क अभिनेत्याची किस घेताना आकांक्षा पुरी ही दिसली. ज्यानंतर तिच्यावर जोरदार टीका देखील करण्यात आली. आकांक्षा पुरी ही तिच्या पर्सनल लाईफमुळे कायमच चर्चेत असते. आकांक्षा पुरी ही सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना देखील आकांक्षा पुरी दिसते.
आता नुकताच आकांक्षा पुरी हिच्याकडून लग्नाबद्दल अत्यंत मोठा खुलासा करण्यात आलाय. आकांक्षा पुरी म्हणाली की, आता अब्दू रोजिक याचेही लग्न झाले. मीच बाकी आहे. मला वाटते की, आता लग्न करण्यासाठी मलाही विदेशातच जावे लागेल. तिथेच होईल लग्न. आता आकांक्षा पुरी हिच्या या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे.
हेच नाही तर पुढे आकांक्षा पुरी ही म्हणाली की, जे माझ्यासोबत लग्न करू इच्छितात, ते माझ्यासोबत संपर्क करू शकतात. यावेळी आकांक्षा पुरी हिला विचारण्यात आले की, तुला मुलगा कसा हवाय? यावर आकांक्षा पुरी म्हणाली की, मला फक्त स्वभावाने चांगला असलेला मुलगा हवा आहे, मी सर्वकाही तडजोड करण्यास तयार आहे.
म्हणजेच काय तर लग्नासाठी तुम्ही जर मुलगी शोधत असाल तर तुम्ही थेट आकांक्षा पुरी हिला संपर्क करू शकता. आकांक्षा पुरी ही मीका सिंग याच्या स्वयंवरमध्ये सहभागी झाली होती. विशेष म्हणजे त्यावेळी शोमध्ये मीका सिंग याने आकांक्षा पुरीची निवड लग्नासाठी केली होती. मात्र, त्यानंतर आम्हाला थोडा वेळ लागेल, एकमेकांना जाणून घ्यायचे असल्याचे सांगून त्यांनी लग्न करणे टाळले.
आता आकांक्षा पुरी हिच्या या मुलाखतीनंतर लोक तिला अनेक प्रश्न विचारताना दिसत आहेत. एकाने लिहिले की, मीका सिंह कुठे गेला? दुसऱ्याने लिहिले की, मीका सिंगसोबत ब्रेकअप झाले का ? तिसऱ्याने लिहिले की, तुमचा जो स्वयंवर होता तो फेकच होता का? आकांक्षा पुरी ही अभिनेता पारस याला डेट करत होती. आकांक्षा पुरी हिने पारसवर अत्यंत गंभीर आरोप केले. त्यानंतर ते दोघे विभक्त झाले.