मुंबई : हिंदी मनोरंजन विश्वात 90चे दशक अतिशय संस्मरणीय मानले जाते. या दशकात अनेक महान कलाकारांची कारकीर्द बहरली होती. 90च्या दशकातच अनेक नवोदित अभिनेत्रींनी आपल्या करिअरची सुरुवात देखील केली होती. अशा नवोदित अभिनेत्रींपैकी एक होती अंजला झवेरी (Anjala Zaveri). अंजला झवेरीला 90च्या दशकांत चाहते ‘नॅचरल ब्युटी’ या नावाने ओळखत होते (Actress Anjala Zaveri marries actor Tarun Arora and spending time with family).
सौंदर्यात बड्या बड्या अभिनेत्रींना टक्कर देणाऱ्या अभिनेत्री अंजला झवेरीने अक्षय खन्नाबरोबर मनोरंजन विश्वात पदार्पण केले होते. पण, आता बर्याच काळापासून अभिनेत्री चित्रपटांच्या दुनियेपासून दूर असून एकांतात आपले जीवन जगत आहे. चला तर जाणून घेऊया की ही अभिनेत्री सध्या काय करतेय…
अंजला झवेरीचा शोध विनोद खन्ना यांनी घेतला होता. जेव्हा विनोद खन्ना ‘हिमालय पुत्र’ या चित्रपटातून मुलगा अक्षय खन्ना लाँच करणार होते, तेव्हा ते एका नवीन चेहऱ्याच्या शोधात होते. अशा वेळी विनोद खन्नांचा शोध अंजला झवेरीवर येऊन थांबला. हा चित्रपट फ्लॉप ठरला असला तरी, हे दोन्ही नवखे कलाकार प्रेक्षकांना परिचित झाले.
अंजलाने बर्याच चित्रपटांमध्ये काम केले, पण या सर्वात तिला अपेक्षित असे यश मिळाले नाही. अभिनेत्रीचा ‘जब प्यार किया तो डरना क्या’ हा चित्रपट हिट ठरला. मात्र, या चित्रपटातही ती फक्त एका सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटात ती अरबाज खान सोबत दिसली होती. सलमान खान आणि काजोल या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाशिवाय अंजलाच्या वाट्याला इतर यशस्वी बॉलिवूड चित्रपट आलेच नाहीत (Actress Anjala Zaveri marries actor Tarun Arora and spending time with family).
बॉलिवूडमध्ये जास्त यश न मिळाल्याने अंजला टॉलिवूडकडे वळली. दक्षिणेत अभिनेत्रीला चांगले यश मिळाले ही मोठी गोष्ट आहे. अंजलाने नागार्जुन, नंदामुरी बालकृष्ण, सुदीप आणि मामूट्टी सारख्या कलाकारांसह मोठ्या पडद्यावर काम केले आणि इथेच तिच्या नावावर अनेक यशस्वी चित्रपट लिहिले गेले. मात्र, आता अभिनेत्रीनेही दक्षिणच्या चित्रपटांपासूनही स्वत:ला दूर केले आहे. अंजला झवेरी शेवट 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या तेलुगू चित्रपट ‘लाईफ इज ब्यूटीफुल’मध्ये दिसली होती.
अंजला झवेरीने अभिनेता तरुण अरोराशी लग्न केले आहे. ‘जब वी मेट’ या चित्रपटात तरुण अरोराने काम केले होते. त्या चित्रपटात तो करीना कपूरच्या प्रियकराच्या भूमिकेत दिसला होता. आता अंजला लग्नानंतर शांततेत आपले वैयक्तिक जीवन जगत आहे. आता ती आपला पूर्ण वेळ केवळ परिवाराला देत आहे.
(Actress Anjala Zaveri marries actor Tarun Arora and spending time with family)
So Expensive : सोनम कपूरचा क्लासी अवतार, ड्रेसची किंमत लाखाच्या घरात
Sherni : विद्या बालनच्या ‘शेरनी’ गर्जना!, ट्रेलर आला; 18 जूनला होणार चित्रपट प्रदर्शित!https://t.co/X47LUEKcDj#VidyaBalan #SherniOnPrime #SherniTrailer
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 2, 2021