स्वतःला संपवण्यापूर्वी अभिनेत्रीकडून खास व्यक्तीसोबत व्हिडीओ पोस्ट, मृत्यूचं कारण…

| Updated on: Sep 01, 2023 | 3:13 PM

अत्यंत धक्कादायक ! वयाच्या ३१ व्या वर्षी अभिनेत्रीने घेतला अखेरचा श्वास, खास व्यक्तीसोबत पोस्ट केलेली व्हिडीओ पाहताच कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

स्वतःला संपवण्यापूर्वी अभिनेत्रीकडून खास व्यक्तीसोबत व्हिडीओ पोस्ट, मृत्यूचं कारण...
Follow us on

मुंबई | 1 सप्टेंबर 2023 : प्रसिद्ध अभिनेत्री अपर्णा नायर हिने वयाच्या ३१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. अभिनेत्रीच्या निधनाने सर्वत्र खळबळ माजली आहे. राहत्या घरात अभिनेत्रीचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळल्यामुळे कुटुंबियांसह चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्रीच्या निधनानंतर एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. अभिनेत्री निधनानंतर पती आणि दोन मुलांना मागे सोडून गेली आहे. मृत्यूपूर्वी अभिनेत्रीने मुलीवर असलेले प्रेम सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केलं. अभिनेत्रीच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

रिपोर्टनुसार, अभिनेत्रीला खोलीत पाहिल्यानंतर, अपर्णाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. रुग्णालयात पोहोचल्यानंतर अभिनेत्रीचं निधन झालं असल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. पण मृत्यूचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पोलिसांना किल्लीपालम येथील एका खाजगी रुग्णालयातून मृत्यूची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. सध्या अभिनेत्रीच्या मृत्यू प्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत.

निधनापूर्वी लेकीवर व्यक्त केलं प्रेम

अभिनेत्रीने मृत्यूपूर्वी लेकीचे अनेक फोटो एकत्र करुन एक व्हिडीओ तयार केला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. मुलीचा व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये, ‘माझी उन्नी… प्लेफुल लिटिल वन…’ असं लिहिलं आहे. अभिनेत्रीच्या इन्स्टाग्रामवर सर्वात जास्त पती आणि मुलांसोबत फोटो आणि व्हिडीओ आहेत.

अपर्णा हिच्या प्रोफेशनल आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक टीव्ही मालिका आणि सिनेमांमध्ये भूमिका बजावल्या आहेत. अपर्णा हिने ‘चंदनमामा’, ‘आत्मसाखी’, ‘मैथिली वीन्दुम वरुम’, ‘देवस्पर्शम’ यांसारख्या अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. तर अपर्णा हिने ‘मेघतीर्थम’, ‘मुथुगौ’, ‘अचायन्स’, ‘कोडथी समक्षम बालन वकील’ आणि ‘कल्की’ यांसारख्या सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीच्या याप्रकरणी करमणा पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. पण मृत्यूचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. सध्या पोलीस अभिनेत्रीच्या मृत्यूचा तपास करत आहेत. अभिनेत्रीच्या निधनामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

आतापर्यंत इंडस्ट्रीमधील अनेक सेलिब्रिटींनी स्वतःला संपवण्याचा  निर्णय घेतला. ज्यामुळे सिनेविश्वात एकच खळबळ माजली होती. आता अभिनेत्रीने टोकाचा निर्णय का घेतला? असा प्रश्न अपर्णा हिचे चाहते विचारत आहेत.