मुंबई : बालिका वधू मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत असलेली अभिनेत्री अविका गोर (Avika Gor) ही नेहमीच चर्चेत असते. विशेष म्हणजे आजही अनेक लोक हे अविका गोर हिला आनंदी याच नावाने ओळखतात. अविका गोर हिला खरी ओळख ही आनंदीच्या भूमिकेमधून मिळालीये. अविका गोर हिने बाल कलाकार म्हणून आपल्या करिअरची (Career) सुरूवात केलीये. टीव्ही मालिकांमध्ये एक अत्यंत मोठा काळ हा अविका गोर हिने गाजवला आहे. सोशल मीडियावर तगडी फॅन फाॅलोइंगही (Fan following) अविका गोर हिची बघायला मिळते. अविका गोर हिचे आनंदीच्या भूमिकेने आयुष्य बदलून टाकले आहे. आताही नेहमीच अविका गोर ही चर्चेत असते.
अविका गोर हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये फक्त टीव्ही मालिकाच नाही तर अनेक गाणे आणि काही तेलगू चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. मात्र, आता बाॅलिवूड चित्रपटामध्ये थेट मुख्य भूमिकेमध्ये अविका गोर ही दिसणार आहे. मात्र, चित्रपट रिलीज होण्यापूर्वी नुकताच अविका गोर हिने अत्यंत मोठा खुलासा हा केला आहे.
अविका गोर हिने विक्रम भट्ट यांच्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. अविका गोर ही म्हणाली की, मला मॅनेजरचा फोन आला की, विक्रम भट्ट यांना तुमच्याशी व्हिडीओ काॅलवर बोलायचे आहे. मग मी त्यांच्यासोबत व्हिडीओ काॅलवर बोलण्यास सुरूवात केली. मात्र, शेवटी त्यांचे बोलणे ऐकून मला मोठा धक्का बसला. कारण त्यांनी शेवटी असे काही बोलले की, मी हैराण झाले. त्यांनी माझ्याकडे मोठी मागणी केली.
व्हिडीओ काॅलच्या सुरूवातीला त्यांनी मला सर्व चित्रपटाची स्टोरी सांगितली. त्यावेळी मला वाटले की, आता ते शेवटी माझे ऑडिशन घेतील. परंतू व्हिडीओ काॅलच्या शेवटी त्यांनी थेट त्यांच्या चित्रपटाची आॅफर मला दिसली आणि खरोखरच माझ्यासाठी हे अत्यंत धक्कादायक होते. कारण विक्रम भट्ट यांनी कोणतेच ऑडिशन न घेतला त्यांच्या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मला दिली.
विक्रम भट्ट यांच्या 1920 – हॉरर ऑफ द हार्ट या चित्रपटात अविका गोर ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट फॅमिली ड्रामा हॉरर चित्रपट आहे. अविका गोर या चित्रपटात दिसणार असल्याने तिच्या चाहत्यांमध्येही मोठा उत्साह बघायला मिळत आहे. 23 जून 2023 रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना अविका गोर ही दिसत आहे.