वयाच्या २१ व्या वर्षात अभिनेत्रीकडे कोट्यवधींची संपत्ती; सोशल मीडियावरही तिचाच बोलबाला

| Updated on: Jan 08, 2023 | 1:59 PM

२१ वर्षात ग्लॅमरस दिसणाऱ्या अभिनेत्रीकडे कोट्यवधींची संपत्ती; महिन्याला कमावते इतके रुपये

वयाच्या २१ व्या वर्षात अभिनेत्रीकडे कोट्यवधींची संपत्ती; सोशल मीडियावरही तिचाच बोलबाला
वयाच्या २१ व्या वर्षात अभिनेत्रीकडे कोट्यवधींची संपत्ती; सोशल मीडियावरही तिचाच बोलबाला
Follow us on

मुंबई : आपल्या सौंदर्यांनं आणि मोहक स्माईलनं चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री अवनीत कौर कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहत्यांकडून कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत असतो. अवनीतचे इन्स्टाग्रामवर जवळपास ३२ मिलियन फॉलोअर्स आहेत. एवढंच नाही, तर सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या दिवसागणिक वाढत असते.

अवनीतने २०१० मध्ये करियरला सुरुवात केली. डान्स लिटिल मास्टरमध्ये तिने आपल्या डान्सची जादू चाहत्यांना दाखवली. शिवाय २०१४ मध्ये अभिनेत्री ‘मर्दानी’ सिनेमात देखील झळकली. सध्या यशाचे उच्च शिखर चढणारी अवनीत कोट्यवधी रुपयांची मालक आहे. तिच्या संपत्तीचा आकडा वाचून तुम्हाला देखील धक्का बसेल.

 

 

वयाच्या २१ व्या वर्षात अभिनेत्रीकडे जवळपास ११ कोटींची संपत्ती आहे. मीडियारिपोर्टनुसार अवनीत महिन्याला ८ लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे कमावते. अभिनेत्री प्रचंड रॉयल आयुष्य जगते. तिच्या प्रत्येक स्टाईलची चाहत्यांमध्ये चर्चा रंगलेली असते. एवढंच नाही, तर तिला अनेक ठिकाणी मित्रांसोबत पार्टी करताना स्पॉट देखील केलं जातं.

अवनीतबद्दल एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अभिनेत्री लवकरच एका मालिकेमध्ये महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. अवनीत ‘अली बाबा दास्तान-ए-काबुल’ (Ali Baba Dastaan-e-Kabul) मालिकेत अभिनेत्री तुनिशा शर्माच्या ‘मरियम’ भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे.

तुनिशाने २४ डिसेंबर रोजी गळफास घेवून आत्महत्या केल्यामुळे मालिकेत तिच्या जागी अवनीतची वर्णी लागणार असल्याची चर्चा जोर धरु लागली आहे. मालिकेत तुनिशाला रिप्लेस करण्यासाठी मेकर्सने अवनीतची निवड केल्याची माहिती समोर येत आहे. म्हणून अभिनेत्री येत्या काळात ‘मरियम’ च्या भूमिकेत दिसेल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.