नाना पाटेकरांसोबत लिव्ह इनमध्ये,अक्षय,सलमानसोबत अफेअरच्या चर्चा; एका चित्रपटाने संपवलं करिअर,बॉलिवूड अभिनेत्रीची फारच चर्चा

| Updated on: Dec 21, 2024 | 5:51 PM

अशी एक अभिनेत्री होत्या जिने अनेक हिट चित्रपट दिले. खाजगी आयुष्य आणि एका चित्रपटामुळे करिअरच संपले. नाना पाटेकर, मिथुन चक्रवर्ती, अक्षय कुमार आणि सलमान खान यांच्याशी अफेअरच्या बऱ्याच चर्चाही फिल्मइंडस्ट्रीत झाल्याचं म्हटलं जातं.

नाना पाटेकरांसोबत लिव्ह इनमध्ये,अक्षय,सलमानसोबत अफेअरच्या चर्चा; एका चित्रपटाने संपवलं करिअर,बॉलिवूड अभिनेत्रीची फारच चर्चा
Follow us on

अशा फार थोड्या अभिनेत्री आहेत ज्यांनी फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं अन् त्या प्रसिद्ध झाल्यात. यात 90 च्या दशकातील अभिनेत्रींबद्दल बोलायचं झालं तर करिश्मा कपूर, काजोल, माधुरी दीक्षित,रवीना टंडन, जुही चावला , शिल्पा शेट्टी, या अभिनेत्रींनी त्यांच्या सौंदर्याने आणि त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. ते आजपर्यंत त्यांचा चाहता वर्ग कमी झालेला नाही.

या अभिनेत्री आजही इंडस्ट्रीत सक्रिय आहेत तर काहींनी मात्र त्याच्या वैयक्तिक कारणामुळे किंवा त्यांच्याबद्दल घडलेल्या प्रसंगामुळे चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला. अशीच एक अभिनेत्री जिच्या फिल्म इंडस्ट्रीमधील एन्ट्री झाली अन् तिच्या सौंदर्याचे अन् अभिनयाचे सर्वच चाहते झाले. पण एका चित्रपटामुळे या अभिनेत्रीचे करिअरचं संपलं. ती अभिनेत्री म्हणजे आयशा जुल्का.

अनेक हिट चित्रपट दिलेली अभिनेत्री

आयशा जुल्का यांनी सुपरस्टार्ससोबत अनेक हिट चित्रपट दिले. त्यांच्या सौंदर्याचं चाहते घायाळ व्हायचे. या अभिनेत्रीने 1991 मध्ये तिच्या करिअरला सुरुवात कुर्बानी या चित्रपटातून केली. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 50 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यापैकी बहुतेक बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले. त्या काळातील अनेक बड्या स्टार्ससोबतची त्यांची जोडी प्रेक्षकांना आवडायची.

90 च्या दशकात टॉपच्या अभिनेत्रींच्या यादीत त्यांचा समावेश होता. ‘जो जीता वही सिकंदर’, ‘खिलाडी’ आणि ‘दिल की बाजी’ या चित्रपटांनी त्यांना जास्त प्रसिद्धी मिळाली. फॅनफॉलोइंग वाढलं. त्या त्यांच्या सौंदर्य आणि अभिनयामुळे इंडस्ट्रीत खूप लोकप्रिय होत्या. मात्र, मिथुन चक्रवर्तीसोबत चित्रपटात काम करणे त्यांच्या करिअरसाठी महाग पडलं.

चुकीचा चित्रपटामुळे करियर खराब

चुकीचा चित्रपट कलाकारांचे करियर खराब करू शकतं असं म्हटलं जातं आणि आयशा यांच्याबाबतीत तेच झालं. त्यांच्या एका चित्रपटाच्या चुकीमुळे त्यांना पश्चात्ताप करण्याची वेळ आली. 1993 मध्ये मिथुन चक्रवर्तीचा ‘दलाल’ चित्रपट प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये आयशा झुल्का देखील होत्या. हा चित्रपट साईन करण्याआधी त्यांच्या आईचाही नकार होता. पण तरीही आयशाने हा चित्रपट साईन केला आणि जे घडायला नको तेच झालं.

‘दलाल’ चित्रपटात बॉडी डबल असे काही सीन्स त्यांनी केले होते जे त्याच्या करिअरसाठी धोकादायक ठरले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या सीन्समुळे त्यांचे करिअर डबघाईला आले. नंतर ही दृश्ये पाहिल्यानंतर आयशाने दिग्दर्शकाविरुद्ध केसही दाखल केली, पण काही उपयोग झाला नाही. या चित्रपटामुळे त्यांच्या कारकिर्दीचे बरेच नुकसान झाले.

खाजगी आयुष्याचीही तेवढच चर्चेत

या चित्रपटानंतर आयशाने अनेक चित्रपटांमध्ये काम केले, मात्र तिचा एकही चित्रपट हिट झाला नाही. खरं तर, चित्रपटानंतर निर्मात्यांना त्याच्याकडून अशाच कमी बजेटच्या चित्रपटांची अपेक्षा होती. याचा परिणाम असा झाला की आयशाचे करिअर खराब झाले.

दरम्यान आयशा यांच्या अभिनयाप्रमाणेच त्यांच्या खाजगी आयुष्याचीही तेवढीच चर्चा झाली होती. मीडिया रिपोर्ट्सवर आयशा जुल्काने बहुतेक सहकलाकारांना डेट केल्याचं म्हटलं जातं. नाना पाटेकर, मिथुन चक्रवर्ती, अक्षय कुमार आणि सलमान खानसोबतसुद्धा त्याचं नाव चर्चेत होतं.

रिपोर्ट्सनुसार, आयशा त्यांच्यापेक्षा 24 वर्षांनी मोठे अभिनेते नाना पाटेकर यांच्यासोबत लिव्ह इनमध्ये असल्याच्या चर्चा होत्या. मात्र त्यांचे नाते लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही. याशिवाय अक्षय कुमारसोबतच्या त्यांच्या अफेअरच्या ही बऱ्याच चर्चा त्यावेळी झाल्या होत्या. पण आयशा यांनी या कोणत्याच नात्यांवर भाष्य केलं नाही.