Actress Bhagyashree love story : प्रत्येकाला शाळेमध्ये एकदा तरी प्रेम होतच. पण शाळेतलं ते पहिलं प्रेम फार कमी जणांचं पूर्ण होतं. पण शाळा संपली की प्रेम देखील संपूण जातं असं म्हणतात. पण बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीने शाळेतलं प्रेम म्हणजे भातुकलीचा खेळ? हे समीकरण पूर्ण बदललं आहे. जिने आई – वडिलांच्या विरोधात जावून शाळेत ज्या मुलासोबत प्रेम झालं त्यांच मुलासोबत लग्न केलं आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ‘मैंने प्यार किया’ (Maine Pyaar Kyun Kiya) फेम अभिनेत्री भाग्यश्री (Bhagyashree) आहे. ‘मैंने प्यार किया’ सिनेमानंतर एका रात्रीत भाग्यश्रीला लोकप्रियता मिळाली. १९८९ साली प्रदर्शित झालेल्या ‘मैंने प्यार किया’ सिनेमाने चाहत्यांच्या मनात राज्य केलं. त्यानंतर अभिनेत्री शाळातील मित्र हिमालय दसानी यांच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर भाग्यश्री झगमगत्या विश्वापासून दूर झाली आणि तिने पूर्ण वेळ कुटुंबाला दिला. पण आजही त्यांची लव्हस्टोरी चाहत्यांमध्ये चर्चेत असते.
भाग्यश्री हिने सांगितल्यानुसार, तिची आणि हिमालय यांची पहिली भेट शाळेत झाली होती. हिमालय शाळेतील सर्वात मस्तीखोर मुलांपैकी एक होता. शाळेत भाग्यश्री आणि हिमायल यांच्यामध्ये कायम वाद व्हायचे. पण तेव्हा ते एकमेकांना डेट करत नव्हते. एका मुलाखतीत खुद्द भाग्यश्री हिने तिच्या आणि हिमालय यांच्या नात्याबद्दल सांगितलं.
भाग्यश्री म्हणाली, ‘एक दिवस हिमालय मला म्हणाले की तुझ्यासोबत काही तरी बोलायचं आहे आणि त्यानंतर जवळपास एक आठवडा ते काही बोलले नाहीत. बोलण्याचा प्रयत्न करायचे पण मनातील भावना व्यक्त करु शकत नव्हते. एक दिवस मी त्यांना म्हणाली, तुम्ही जे काही बोलाल त्याचं उत्तर सकारात्मक असेल. त्यानंतर हिमालय यांनी माझ्याकडे मनातील भावना व्यक्त केल्या.’
पुढे भाग्यश्री म्हणाली, ‘आमच्या कुटुंबियांना आमचं नातं मान्य नव्हतं. त्यामुळे आम्ही मोठा निर्णय घेण्याचं ठरवलं. त्यानंतर आम्ही आई – वडिलांच्या विरोधात जावून मंदीरात लग्न केलं. तेव्हा आमच्या लग्नात हिमालय यांचे कुटुंबिय, सलमान खान आणि सूरज बडजात्या उपस्थित होते…’ आज भाग्यश्री तिच्या कुटुंबासोबत आनंदी आयुष्य जगत आहे.
एका मुलाखतीत भाग्यश्री हिने ती सध्या करत असलेलं काम आणि तिच्या मुलांबद्दल सांगितलं. अभिनेत्री पती हिमालय यांच्यासोबत मीडिया कंपनी सृष्टि एन्टरटेनमेन्टचं काम पाहते. तर अभिनेत्रीची मुलीने लंडनमध्ये पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आहे. तर तिच्या मुलाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. सध्या भाग्यश्री मोठ्या पड्यावर सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर मात्र कायम सक्रिय असते.