बाॅलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू हिने एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. फक्त बाॅलिवूडच नाही तर तामिळ, तेलगू, बंगाली आणि इंग्रजी चित्रपटांमध्येही बिपाशा बासूने धमाकेदार भूमिका केल्या आहेत. बिपाशा बासू हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. बिपाशा बासू ही आज कोट्यवधी संपत्तीची मालकीन देखील आहे. 2001 मध्ये बिपाशा बासू हिने करिअरला सुरूवात केली. जिस्म, राज आणि अलोन यासारख्या हिट चित्रपटात तिने भूमिका केल्या. हेच नाही तर जवळपास 35 चित्रपटांमध्ये बिपाशा बासूने काम केले.
बिपाशा बासू ही तिच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत असते. बिपाशा बासू हिने दोन घटस्फोट झालेल्या अभिनेत्यासोबत लग्न केले. हेच नाही तर बिपाशा बासू हिने तब्बल 10 वर्षे अभिनेता जॉन अब्राहम याला डेट केले. यानंतर 2011 मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले. जॉन अब्राहम आणि बिपाशा बासू यांच्या लग्नाची चर्चा काही वर्षांपूर्वी रंगताना दिसली. परंतू ती अफवाच होती.
जॉन अब्राहम याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर बिपाशा बासू हिने करण सिंह ग्रोवर याला डेट करण्यास सुरूवात केली. अलोन चित्रपटाच्या सेटवर यांची ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि दोघेही त्यानंतर प्रेमात पडले. ज्यावेळी अलोन चित्रपटाची शूटिंग सुरू होती, त्यावेळी करण सिंह ग्रोवर याचे लग्न झालेले होते, हेच नाही तर ते त्याचे ते दुसरे लग्न होते.
यानंतर करण सिंह ग्रोवर याने पत्नीसोबत घटस्फोट घेतला. हेच नाही तर करण सिंह ग्रोवरचे पत्नी जेनिफर विंगेट हिच्यासोबतचे वाद टोकाला गेले होते आणि याला बिपाशा बासूच कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. 2016 मध्ये करण सिंह ग्रोवर आणि बिपाशा बासू यांनी लग्न केले. करण सिंह ग्रोवर हे तिसरे लग्न होते. करण आणि बिपाशा बासू यांनी पहिल्यांदा कोर्टात लग्न केले होते.
बिपाशा बासू आणि करण सिंह ग्रोवरची एक मुलगी देखील आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री चित्रपटांपासून दूर आहे. बिपाशा बासू ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना कायमच दिसते. बिपाशा बासू हिची जबरदस्त फॅन फाॅलोइंग आहे. मात्र, करण सिंह ग्रोवर याच्यासोबत बिपाशा बासू हिने लग्न केल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.