मुंबई : टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर ही कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. शोएब इब्राहिम याच्यासोबत निकाह केल्यानंतर दीपिका कक्कर ही अभिनयापासून दूर आहे. मात्र, असे असताना देखील दीपिका कक्कर ही सोशल मीडियावर सक्रिय असते. दीपिका कक्कर ही तिच्या ब्लाॅगच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. हेच नाही तर आपल्या पर्सनल लाईफबद्दलही अपडेट शेअर करताना दिसते. दीपिका कक्कर हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये हिट मालिका केल्या आहेत. दीपिका कक्कर हिच्यावर शोएब इब्राहिम याच्यासोबत केलेल्या निकाहनंतर जोरदार टीका करण्यात आली.
सध्या दीपिका कक्कर ही नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आल्याचे बघायला मिळतंय. दीपिका कक्कर हिच्यावर जोरदार टीका होताना दिसत आहे. दीपिका कक्कर ही तिच्या ब्लाॅगमध्ये स्वयंपाक तयार करताना दिसते. वेगवेगळ्या रेसिपी चाहत्यांसोबत शेअर करते. हेच नाही तर झलक दिखला जा 11 च्या सेटवर दीपिका कक्कर सर्वांसाठी बिर्याणी तयार करून घेऊन गेल्याचे बघायला मिळाले.
दीपिका कक्कर हिचे काही फोटो आणि व्हिडीओ चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. यावरून तिच्यावर टीका ही केली जातंय. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, दीपिका कक्कर हिने रोजा (रमजानचा उपवास) ठेवलाय. हेच लोकांना आवडले नसल्याचे बघायला मिळतंय. दीपिका कक्कर हिला अनेकांनी व्हिडीओवर कमेंट करत मोठा प्रश्न विचारल्याचे बघायला मिळतंय.
एकाने कमेंट करत लिहिले की, रोजा ठेवला हे ठीक आहे मात्र नवरात्रीमध्ये उपवास पकडणार का? दुसऱ्याने लिहिले की, ही दीपिका कक्कर दोन्ही धर्मांचा मजाक बनवत आहे. तिसऱ्याने लिहिले की, शोमध्ये मुख्य अभिनेत्रीचे पात्र साकारत होती आणि आता बघा काय झाली. लोक जोरदार टीका करताना दीपिका कक्कर हिच्यावर दिसत आहेत.
शोएब इब्राहिम याच्यासोबत निकाह केल्यानंतर दीपिका कक्कर हिने मुस्लीम धर्म स्वीकारला आहे. काही दिवसांपूर्वीच दीपिका कक्कर हिने एका बाळाला जन्म दिलाय. दीपिका कक्कर ही कायमच तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत दिसते. दीपिका कक्कर हिचे शोएब इब्राहिम याच्यासोबतचे हे दुसरे लग्न आहे. दीपिका कक्कर हिची मोठी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.