प्रेग्नेंट दीपिका पादुकोण पतीसोबत लुटतेय सुट्ट्यांचा आनंद, बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसली अभिनेत्री

| Updated on: May 07, 2024 | 3:02 PM

Deepika Padukone | अभिनेत्री दीपिका पादुकोण पहिल्यांदा दिसली बेबी बम्प फ्लॉन्ट करताना, अभिनेत्रीचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दीपिका पादुकोण हिच्या फोटोची चर्चा... अभिनेत्रीला पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण...

प्रेग्नेंट दीपिका पादुकोण पतीसोबत लुटतेय सुट्ट्यांचा आनंद, बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसली अभिनेत्री
Follow us on

बॉलिवू़डचे स्टार कपल अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी दीपिका आणि रणवीर यांनी लवकरच आई – वडील होणार असल्याची घोषणा केली आहे. सध्या दीपिका प्रेग्नेंसीच्या दिवसांचा आनंद लूटत आहे. प्रेग्नेंसीमुळे गेल्या काही दिवसांपासून लाईम-लाईटपासून दूर आहे. पण आता दीपिका हिचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये दीपिका पती रणवीर याच्यासोबत दिसत आहे. फोटोमध्ये दोघे आनंदी दिसत आहेत.

सांगायचं झालं तर, प्रेग्नेंट असल्यामुळे यंदाच्या वर्षी दीपिका मेट गालासाठी उपस्थित राहू शकली नाही. ज्यामुळे चाहत्यांमध्ये अभिनेत्रीबद्दल चर्चा रंगत आहे. दरम्यान, दीपिका हिचा एक फोटो समोर आल्यामुळे चाहत्यांना देखील आनंद झाला आहे. व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये अभिनेत्री पायऱ्या उतरताना दिसत आहे.

हे सुद्धा वाचा

 

 

ओव्हर साईझ टी-शर्ट आणि डेनिमध्ये असलेल्या दीपिका हिने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. फोटोमध्ये अभिनेत्री पहिल्यांता बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसली. व्हायरल होत असलेला फोटो कुठला आहे? याबद्दल काही कळू शकलेलं नाही. पण अभिनेत्रीच्या फोटो चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत.

दीपिकाची सोशल मीडिया पोस्ट

काही दिवसांपूर्वी दीपिकाने प्रेग्नेंट असल्याची घोषणा केली. सप्टेंबर 2024 मध्ये दीपिका तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. सोशल मीडियावर  दीपिका – रणवीर यांच्या पोस्ट शेअर करत चाहत्यांसोबत आनंद शेअर केला. दीपिका – रणवीर यांच्या पहिल्या बाळाचा जन्म सप्टेंबर 2024 मध्ये होणार आहे. महिन्याच्या शेवटी अभिनेत्री बाळाला जन्म देईल. सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून दीपिका हिच्या प्रेग्नेंसीची चर्चा रंगली होती.

दीपिका पादुकोण – रणवीर सिंग यांचे आगामी सिनेमे

दीपिका पादुकोण – रणवीर सिंग यांच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, दोघे देखील दिग्दर्शक रोहीत शेट्टी याच्या ‘सिंघम अगेन’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत. सिनेमाचे काही पोस्टर देखील दीपिका – रणवीर यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सिनेमात दोघांसोबत अजय देवगन, अक्षय कुमार, अर्जुन कपूर, करीना कपूर, टायगर श्रॉफ यांच्यासोबत अन्स सेलिब्रिटी देखील झळकणार आहेत.