अभिनेत्री दीपिका कक्कर हिने मोठा काळ टीव्ही मालिकांमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे दीपिका कक्कर हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळाते. दीपिका कक्कर ही कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे. दीपिका कक्कर हिने शोएब इब्राहिम याच्यासोबत लग्न केल्यापासून ती तशी मोठ्या पडद्यापासून दूर आहे. मात्र, असे असले तरीही दीपिका कक्कर ही आपल्या चाहत्यांच्या कायमच संपर्कात असते. दीपिका कक्कर ही व्लॉगच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीचे अपडेट आपल्या चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. दीपिका कक्कर हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.
दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम यांच्या मुलाचे नाव रूहान आहे. आता रूहान एक वर्षाचा झालाय. आपल्या लेकासोबतची धमाल कायमच व्लॉगमध्ये दीपिका कक्कर ही दाखवते. दीपिका कक्कर हिने नुकताच तिच्या व्लॉगमध्ये मोठा खुलासा केलाय. विशेष म्हणजे यावेळी दीपिका कक्कर हिच्यासोबत शोएब इब्राहिम देखील दिसत आहे.
दीपिका कक्कर हिने म्हटले की, तुम्हाला सर्वांना एक मोठी गूड न्यूज सांगायची आहे. पण आम्ही सांगण्यापेक्षा तुम्हीच ती गूड न्यूज द्याल. ही एक आमच्यासाठी नक्कीच मोठी खुशखबर आहे. विशेष म्हणजे यावेळी दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद बघायला मिळाला. नेमकी काय गुड न्यूज असेल यावरून विविध चर्चा रंगताना दिसत आहेत.
अनेकांचे म्हणणे आहे की, लवकरच यांच्या घरात दुसऱ्या बाळाचे आगमन होणार आहे. हेच नाही तर दीपिका कक्कर ही प्रेग्नंट असल्याचे सातत्याने सांगितले जातंय. दीपिका कक्कर ही स्पष्टपणे म्हणाली आहे की, ही खुशखबर तुम्ही लोकच काही दिवसांमध्ये जाहीर कराल. आता दीपिका कक्कर हिच्या चाहत्यांमध्ये आनंद बघायला मिळतोय.
रूहान याच्या जन्मानंतर दीपिका कक्कर हिचे वजन चांगलेच वाढल्याचे बघायला मिळतंय. वजन कमी करण्यासाठी दीपिका कक्कर ही प्रयत्न करताना देखील दिसली. दीपिका कक्कर ही कुटुंबियांसाठी कायमच खास पदार्थ बनवताना तिच्या व्लॉगमध्ये दिसते. दीपिका कक्कर हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत.