मुंबई : दिव्या अग्रवाल ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. दिव्या अग्रवाल ही तिच्या प्रेग्नंसीमुळे चर्चेत होती. 20 फेब्रुवारी 2024 रोजी दिव्या अग्रवाल हिने तिच्या बॉयफ्रेंडसोबत लग्न केले. दिव्या अग्रवाल हिच्या लग्नातील एक कार्यक्रमातील व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसला. या व्हिडीओनंतर विविध चर्चा या रंगताना दिसल्या. हेच नाही तर या व्हिडीओमध्ये बेबी बंप लपवताना दिव्या अग्रवाल ही दिसली. यानंतर थेट चर्चा सुरू झाली की, दिव्या अग्रवाल ही लग्नाच्या अगोदरच प्रेग्नंट आहे. या व्हिडीओवर लोक सतत कमेंट करताना देखील दिसले.
खरोखरच दिव्या अग्रवाल ही लग्नाच्या अगोदरच प्रेग्नंट होती का? ही चर्चा सातत्याने रंगताना दिसत आहे. आता शेवटी यावर दिव्या अग्रवाल हिने माैन सोडल्याचे बघायला मिळतंय. हेच नाही तर यावर जाहिरपणे बोलताना दिव्या अग्रवाल ही दिसत आहे. दिव्या अग्रवाल हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत लोकांची बोलती ही बंद केल्याचे दिसत आहे.
दिव्या अग्रवाल हिने पोस्टमध्ये म्हटले की, तुम्ही इतके जाड का आहात, तुम्ही इतके पतले का आहात, इतके जास्त काळे का आहात, इतके छोटे का आहात, इतके उंच का आहात, हे बोला इतके सुंदर का दिसत आहात, प्रत्येक वेळीच बकवास करण्याची अजिबातच गरज नसते भाई..असेही दिव्या अग्रवाल हिने म्हटले आहे.
आता दिव्या अग्रवाल हिची ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. तरीही अजूनही लोक दिव्या अग्रवाल ही लग्नाच्या अगोदरच प्रेग्नंट असल्याचे म्हणताना दिसत आहेत. आता दिव्या अग्रवाल हिची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होताना दिसतंय. दिव्या अग्रवाल ही नेहमीच सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करताना दिसते.
दिव्या अग्रवाल हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. दिव्या अग्रवाल ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय दिसते. आपल्याला चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना देखील दिव्या अग्रवाल ही दिसते. दिव्या अग्रवाल हिच्या लग्नातील फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.