घटस्फोटाच्या चर्चांवर दिव्या अग्रवाल हिने सोडले मौन, मोठा खुलासा, म्हणाली, माझा पती..

| Updated on: May 28, 2024 | 9:59 AM

दिव्या अग्रवाल हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. दिव्या अग्रवालची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. दिव्या अग्रवाल ही बिग बाॅस ओटीटी 1 ची विजेता देखील आहे. सोशल मीडियावर दिव्या अग्रवाल कायमच सक्रिय दिसते. खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

घटस्फोटाच्या चर्चांवर दिव्या अग्रवाल हिने सोडले मौन, मोठा खुलासा, म्हणाली, माझा पती..
Divya Agarwal
Follow us on

बिग बॉस ओटीटी 1 ची विजेता दिव्या अग्रवाल ही कायमच चर्चेत असते. दिव्या अग्रवालची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. दिव्या अग्रवाल हिच्या घटस्फोटाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगताना दिसतंय. हेच नाही तर दिव्या अग्रवाल हिने पतीसोबतचे फोटो सोशल मीडियावरून डिलीट करताच ती लवकरच घटस्फोट घेत असल्याचेही सांगितले गेले. यानंतर दिव्या अग्रवाल हिच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण बघायला मिळाले. आता नुकताच दिव्या अग्रवाल हिने एक पोस्ट शेअर केलीये. या पोस्टमध्ये दिव्या अग्रवाल काही मोठे खुलासे करताना दिसतंय.

दिव्या अग्रवाल हिने 20 फेब्रुवारी 2024 रोजी अपूर्व पाडगावकर याच्यासोबत लग्न केले. लग्नाला काही महिने पूर्ण होत नाहीत, तोवरच तिच्या घटस्फोटाची चर्चा रंगत आहे. शेवटी दिव्या अग्रवाल हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मोठा खुलासा केलाय. दिव्या अग्रवाल हिने या पोस्टमध्ये का फोटो डिलीट केले, सोबतच तिचा पती सध्या कुठे आहे, याबद्दल खुलासा केलाय.

दिव्या अग्रवाल हिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, मी काहीही बोलले नाही, मी कोणताही आवाज केला नाही किंवा याबद्दल मी कोणतीही पोस्ट देखील केली नाही. मी इंस्टाग्रामवरून जवळपास 2500 पोस्ट डिलीट केल्या. पण लग्नाचे फोटो डिलीट केले, यावरूनच चर्चा रंगली. या गोष्टी मिडियात आल्याने आता बोलत आहे. या गोष्टीवरून समजते की, लोकांना माझ्याकडून नेमकी अपेक्षा काय आहे.

मुळात म्हणजे मी माझ्या आयुष्यात असे काही केले की, लोकांना माझ्याकडून जी अपेक्षाच कधी नव्हती. लोकांना फक्त माझ्याकडून घटस्फोट किंवा बाळाची अपेक्षा आहे. परंतू यापैकी काहीही होत नाहीये. सर्व गोष्टींचा शेवट हा आनंददायी असतो. पुढे दिव्याने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, देवाच्या आशिर्वादाने माझा पती अपूर्व पाडगावकर हा शेजारीच झोपला आहे.

तो शेजारी आरामात झोपला असून घोरत आहे. दिव्या अग्रवाल हिने ही पोस्ट इंस्टा स्टोरीवर शेअर केली. गेल्या काही दिवसांपासून सतत दिव्या अग्रवाल हिच्या घटस्फोटाची चर्चा सुरू होती. आता शेवटी दिव्या अग्रवाल हिने घटस्फोटाच्या चर्चांवर थेट भाष्य केल्याचे बघायला मिळतंय. घटस्फोटाची चर्चा करणाऱ्या लोकांना तिने थेट पोस्टच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. आता दिव्या अग्रवालची ही पोस्ट चांगली व्हायरल होताना दिसतंय.