अखेर ईशा देओलचा मोठा खुलासा, ‘या’ व्यक्तीसोबत असलेल्या संबंधावर धर्मेंद्रच्या लेकीने..

| Updated on: May 12, 2024 | 11:53 AM

बाॅलिवूड अभिनेत्री आणि धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची लेक ईशा देओल ही तूफान चर्चेत आहे. नुकताच ईशा देओल हिच्याकडून मोठा खुलासा करण्यात आलाय. ईशा देओल हिच्या विधानाची आता जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. ईशा देओल सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसत आहे.

अखेर ईशा देओलचा मोठा खुलासा, या व्यक्तीसोबत असलेल्या संबंधावर धर्मेंद्रच्या लेकीने..
Esha Deol
Follow us on

बाॅलिवूड अभिनेते धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओल ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. ईशा देओल ही लवकरच राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. हेच नाही तर ईशाच्या राजकीय प्रवेशावर हेमा मालिनी यांच्याकडूनही ग्रीन सिग्नल देण्यात आला. ईशा देओल हिने बाॅलिवूडमधील काही चित्रपटांमध्येही भूमिका केल्या. मात्र, म्हणावे तसे यश तिला मिळाले नाही. ईशा देओल हिने काही दिवसांपूर्वीच पतीसोबत घटस्फोट घेत विभक्त होण्याचा निर्णय घेतला. ईशा देओलला दोन मुली देखील आहेत.

ईशा देओल हिने नुकताच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टमुळे आता ईशा देओल चर्चेत आलीये. ईशा देओल हिने या पोस्टसोबत एक फोटोही शेअर केला. ईशा देओलने या पोस्टमधून खुलासा केला की, तिचे देओल कुटुंबात सर्वात चांगले रिलेशन कोणासोबत आहे. त्या व्यक्तीसोबत तिने फोटोही शेअर केलाय.

हा दुसरा तिसरा कोणी नसून अभय देओल आहे. म्हणजे देओल कुटुंबात सर्वात संबंध ईशाचे अभय देओलसोबतच आहे. अभय देओल हा ईशा देओलचा चुलत भाऊ आहे. ईशाने अभयसोबतचा फोटो शेअर केला. अभयसोबत तिने विकेंड कसा घालवला हे सांगताना ईशा देओल ही दिसली आहे. आता ईशाच्या या पोस्टची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.

ईशा देओल हिचे सावत्र भाऊ सनी देओल आणि बॉबी देओल यांच्यासोबत देखील खूप चांगले रिलेशन आहे. ईशा देओल ही गदर 2 च्या सक्सेस पार्टीला देखील उपस्थित होती. यावेळीचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. सनी देओल, बाॅबी देओल यांच्यासोबत खास पोझ देताना ईशा देओल ही दिसली होती.

ईशा देओल ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसत आहे. हेच नाही तर आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करतानाही ईशा दिसतंय. ईशा देओलची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांचा नुकताच लग्नाच्या वाढदिवस पार पडला. यावेळी ईशा देओल या वाढदिवसासाठी उपस्थित होती.