Satish Kaushik : अभिनेते आणि दिग्दर्शत सतीश कौशिक यांनी आपल्या विनोदबुद्धीने चाहत्यांना प्रचंड हसवलं.. ८० – ९० दशकातील मुलांसाठी सतीश कौशिक प्रचंड खास आहेत. कारण सतीश कौशिक यांच्यामुळे ८० – ९० दशकातील मुलांचं लाहनपण प्रचंड आनंददायी ठरलं. आज देखील ‘मिस्टर इंडिया’ सिनेमातील ‘कॅलेंडर’ प्रत्येकाला आठवत असेल. पण तो कॅलेंडर आज आपल्याला सोडून गेला आहे. त्यामुळे ‘आजचा दिवस कॅलेंडर मधून काढू शकतो?’ असा प्रश्न मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी हिने सतीश कौशिक यांच्या निधनानंतर उपस्थित केला आहे. अभिनेत्रीने एक पोस्ट लिहिली आहे, ज्यामध्ये अभिनेत्रीने भावना व्यक्त केल्या आहे.
सतीश कौशिक यांचा एक फोटो पोस्ट करत हेमांगीने लहानपणीच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. ‘लहानपणी आईने थोडा उशीर केला जेवण वाढायला की समोरचं ताट हातात घेऊन ते Glass ने बडवत “Calendar खाना दो” मोठमोठ्याने म्हणायचं. मग आई “असं ताट वाजवू नये” म्हणून आम्हांला बडवायची.’
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘पण आम्ही कुठे ऐकतोय तिचं. ती जी सवय लागली ती आजतागायत. काय गंमत होती किंवा आहे त्यात कुणास ठाऊक. तुमच्या सोबत काम करताना मी हा किस्सा तुम्हांला सांगितला तेव्हा तुम्ही हसून म्हणाला, “80-90s के हर बच्चे की यही कहानी है!”
‘८०-९० च्या दशकातल्या मुलांचं बालपण तुमच्या Calender ने समृद्ध केलंय आणि मनात कायमचं Tick ही करून ठेवलंय! असं म्हणतात जुनं calendar घरात ठेऊ नये पण हे Calendar मनाच्या भिंतीवर, आठवणींच्या खिळ्याला सदा अडकवलेलं राहील!’ असं म्हणत अभिनेत्रीने भावना व्यक्त केल्या आहेत.
प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या निधनानंतर चाहत्यांसह सेलिब्रिटींना देखील मोठा धक्का लागला आहे. सतीश कौशिक यांच्या निधनानंतर अनेक चाहते आणि सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहत आहे. अभिनेते, विनोदी कलाकार, दिग्दर्शक, निर्माते… या सर्वच क्षेत्रात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या सतीश कौशिक यांच्या निधनामुळे बॉलिवूडचं मोठं नुकसान झालं आहे, असं म्हणायला हरकत नाही.