ब्रेस्ट कॅन्सरनंतर हिना खानने घेतला अत्यंत मोठा निर्णय, अभिनेत्रीला पाहून आई लागली ढसाढसा रडायला आणि…

| Updated on: Jul 04, 2024 | 1:16 PM

अभिनेत्री हिना खान ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. हिना खान हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे हिना खान ही मोठ्या संपत्तीची मालकीन देखील आहे. हिना खान हिचे चाहते सध्या चिंतेत आहे, हिनाने नुकताच एक पोस्ट शेअर केलीये.

ब्रेस्ट कॅन्सरनंतर हिना खानने घेतला अत्यंत मोठा निर्णय, अभिनेत्रीला पाहून आई लागली ढसाढसा रडायला आणि...
hina khan
Follow us on

हिना खान हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. हिना खानची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे हिना खानने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये हिट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. हिना खान मोठ्या संपत्तीची मालकीन देखील आहे. हिना खान हिला आजही लोक अक्षरा या नावानेच ओळखतात. विशेष म्हणजे बिग बॉसच्या घरातही धमाकेदार कामगिरी करताना हिना खान ही दिसली होती. हिना खान सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय दिसते. विशेष म्हणजे आयुष्यातील एका वाईट काळातही आपल्या चाहत्यांच्या संपर्कात सोशल मीडियाच्या माध्यमातून हिना खान दिसत आहे.

हिना खान हिने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. हिना खान ब्रेस्ट कॅन्सरसोबत लढाई लढत आहे. ब्रेस्ट कॅन्सरच्या तिसऱ्या टप्प्यात हिना खान आहे. ब्रेस्ट कॅन्सर झाल्यापासून सोशल मीडियावर सतत पोस्ट शेअर करताना हिना खान दिसत आहे. आता नुकताच हिना खान हिने एक पोस्ट आणि काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. 

हिना खान हिची ही पोस्ट पाहून चाहते चिंतेत आल्याचे बघायला मिळतंय. हिना खानने तिचे केस कट केले आहेत. हिना खानची कीमोथेरपी सुरू झालीये. यामुळे हिना आपले केस कट करताना दिसतंय. हिना खान आपली लढाई खंबीरपणे लढताना दिसत आहे. मात्र, मुलीची स्थिती पाहून तिची आई रडताना दिसत आहे. हिना खानने तिच्या पोस्टसोबत एक व्हिडीओही शेअर केलाय.

यामध्ये केस कट करण्याची तयारी सुरू आहे तर दुसरीकडे व्हिडीओमध्ये तिच्या आईचा रडण्याचा आवाज येताना दिसतोय. हिना खानने लिहिले की, व्हिडीओमध्ये तुम्हाला माझ्या कश्मीरी आईचा जड आवाज येत असेल, ती मला आर्शिवाद देत आहे. कारण ती स्वत:ला काहीतरी बघण्यासाठी तयार करत होती, कधी तिने याची साधी कल्पना देखील केली नव्हती.

मला माहिती आहे केस कट करणे किती जास्त अवघड आहे. केस एक मुकुट आहे, जे कधीच काढला जात नाही. जर तुम्ही इतकी मोठी लढाई लढत असाल तर तुम्हाला हे केस सोडावे लागतील. जर तुम्हाला ही लढाई यशस्वीपणे लढायची असेल तर काही वेगळे निर्णय घ्यावे लागतात. मी या लढाईमध्ये जिंकण्याचे ठरवले आहे. जिंकण्यासाठी मी प्रत्येक संधी देत आहे.

मी माझे सुंदर केस गळून जाण्यापेक्षा त्यांना सोडण्याचा निर्णय घेतलाय. मी काही आठवडे या मानसिक त्रासामधून जाऊ इच्छित नाहीये. त्यामुळे मी स्वत: मुकुट सोडण्याचा निर्णय घेतला. माझी ताकद आणि माझे प्रेम माझ्या स्वत:वर आहे आणि हा या केसांचे एक चांगले विग बनवलण्याचा निर्णय देखील मी नक्कीच घेतला आहे, असेही हिना खान हिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले.