अभिनेत्री ईशा मालवीय ही बिग बॉसमध्ये दिसली. सुरूवातीला धमाकेदार गेम खेळताना ईशा दिसली होती. ईशा मालवीयचा बॉयफ्रेंड समर्थ हा तिला सपोर्ट करण्यासाठी बिग बॉसमध्ये पोहचला होता. दुसरीकडे तिचा एक्स देखील बिग बॉसमध्ये सहभागी झाला. ईशा मालवीय हिच्यावर अनेक गंभीर आरोपही करण्यात आले. ईशा मालवीय आणि समर्थ यांचे काही दिवसांपूर्वीच ब्रेकअप झाले. बिग बॉसच्या घरात ईशा मालवीय हिची अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यासोबत खास मैत्री बघायला मिळाली. आता नुकताच मोठा खुलासा ईशा मालवीयने केलाय.
ईशा मालवीय ही बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर मोठ्या पडद्यावर दिसली नाहीये. उडारिया मालिकेतून ईशा मालवीयला खरी ओळख मिळाली. आता अनेक गोष्टींचा पश्चाताप होताना ईशा मालवीय हिला दिसत आहे. याबद्दलच ईशा मालवीय हिने खुलासा केलाय. ईशा मालवीय हिने एक मुलाखत दिलीये. यावेळी ती अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्याबद्दल बोलताना दिसली.
ईशा मालवीय म्हणाली की, मी खूप जास्त स्वार्थी लोकांना भेटले आणि त्यांच्यासोबत मैत्री केली, आता मला त्या गोष्टींचा पश्चाताप होत आहे. त्या लोकांनी फक्त आणि फक्त माझा वापर केला. मी ज्या लोकांसोबत मैत्री केली त्यांनी माझा वापर केला. कोणीच माझी इज्जत ठेवली नाही. समर्थ आणि अभिषेक तर माझे एक्स आहेत. बाकी सर्वांसोबत मी तर मनापासून मैत्री केली होती.
अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांना मी चांगले मित्र मानत होते. आता मला वाटते की, हीच माझी सर्वात जास्त मोठी चूक होती. मी माझ्या काही गोष्टी विचार करून सांगायला हव्या होत्या. मला आज पश्चाताप होत आहे की, मी अशा लोकांसोबत मैत्री केली. आता ईशा मालवीय हिच्या या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.
हेच नाहीतर बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर ईशा मालवीय ही विकी जैन याच्यासोबत पार्टी करताना देखील दिसली. बिग बॉसच्या घरात असताना ईशा मालवीय ही कायमच अंकिता लोखंडे हिच्या मागे फिरताना दिसत होती. आता अशी एक चर्चा आहे की, ईशा मालवीय आणि अंकिता लोखंडे यांच्यामध्ये काहीतरी मोठा वाद झालाय. यामुळेच ईशा पश्चाताप होत असल्याचे म्हणत आहे.