गेल्या काही दिवसांपासून जस्मिन भसीन आणि अली गोनी हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. अली गोनी आणि जस्मिन हे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अली आणि जस्मिन यांनी बिग बॉसच्या घरातच आपले प्रेम व्यक्त केले. त्याच्याही अगोदरपासून ते रिलेशनमध्ये होते. जस्मिन भसीन हिला डेट करण्याच्या अगोदर अली गोनी हा हार्दिक पांड्या याची एक्स पत्नी नताशा हिला डेट करत होता. नताशाच्या ब्रेकअपनंतर अलीच्या आयुष्यात थेट जस्मिन भसीन आली. हेच नाही तर दोघेही कायमच एकसोबतचे खास फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर शेअर करतात.
काही दिवसांपूर्वीच जस्मिन भसीन हिच्या डोळ्यांना मोठा इजा झाली होती. हेच नाही तर यावेळी तिला काहीच दिसत नव्हते. अशा वाईट काळात जस्मिन भसीन हिची साथ देताना अली गोनी हा दिसला. अली आणि जस्मिनची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडते. हेच नाही तर त्यांना लग्नाबद्दलही कायमच प्रश्न विचारले जाते. आता जस्मिन भसीन हिने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये.
जस्मिन भसीन हिने अली गोनी याच्यासाठी ही पोस्ट शेअर केलीये. अली गोनीपासून अकरा दिवस झाले जस्मिन भसीन ही दूर आहे. तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, आयुष्यात कधीच परत ही वेळ तिला नाही पाहिजे. अकरा दिवस अली गोनी याच्यापासून दूर राहणे आपल्यासाठी किती जास्त कठीण काम होते हे जस्मिन भसीन हिने सांगितले.
जस्मिन भसीन म्हणाली की, या अकरा दिवसांमध्ये मी प्रत्येक मिनिट आणि सेकंद अलीला मिस केले. साधारण साडे सहा वर्षाच्या काळावधीमध्ये पहिल्यांदाच असे झाले की, मी आणि अली इतके दिवस एकमेकांपासून दूर होतो. फक्त दूरच नाही तर या अकरा दिवसांमध्ये आमचे अजिबातच काहीच बोलणे झाले नाही. साधा व्हिडीओ कॉल देखील नाही.
आता जस्मिन भसीन हिची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. मध्यंतरी चर्चा रंगताना दिसली की, जस्मिन भसीन ही लवकरच अली गोनी याच्यासोबत लग्न करणार आहे. मात्र, लग्नाबद्दल जस्मिन भसीन हिच्याकडून स्पष्ट करण्यात आले की, लगेचच तिचा आणि अलीचा लग्न करण्याचा कोणताच विचार नाहीये. अजून बरेच स्वप्न पूर्ण होणे शिल्लक असल्याचेही तिने म्हटले.