जया बच्चन यांच्या मोठा खुलासा, म्हणाल्या, अमिताभ बच्चन यांच्यासोबत…

| Updated on: Aug 20, 2024 | 4:24 PM

अभिनेत्री जया बच्चन यांनी मोठा काळ गाजवला आहे. जया बच्चन यांचा चाहतावर्गही मोठा आहे. अमिताभ बच्चन यांच्याप्रमाणे जया बच्चन या सोशल मीडियावर सक्रिय नाहीत. आता नुकताच जया बच्चन यांनी एक मोठा खुलासा केलाय. जया बच्चन यांच्या या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

जया बच्चन यांच्या मोठा खुलासा, म्हणाल्या, अमिताभ बच्चन यांच्यासोबत...
Jaya Bachchan
Follow us on

बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन यांनी एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. जया बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. जया बच्चन या बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री आहेत. जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांची जोडी प्रेक्षकांना जबरदस्त आवडते. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांमुळे सध्या संपूर्ण बच्चन कुटुंबिय चर्चेत आहेत. मात्र, ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांवर बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही भाष्य करत नाही. आता नुकताच जया बच्चन यांच्याकडून अत्यंत मोठा खुलासा हा करण्यात आलाय.

जया बच्चन या जावेद अख्तर आणि सलीम खान डॉक्यूमेंटी ‘द एंग्री यंगमॅन’ वेळी बोलताना दिसल्या. जया बच्चन यांनी म्हटले की, मी सुरूवातीला अमिताभ बच्चन यांच्या जंजीर चित्रपटामध्ये काम करण्यास नकार दिला. मीच नाही तर माझ्या अगोदर अनेकांनी या चित्रपटाला नकार दिला होता. जया बच्चन यांचे हे विधान ऐकून लोक हैराण झाले.

पुढे जया बच्चन या म्हणाल्या की, मला कधीच पुरुषकेंद्रित चित्रपटाचा भाग व्हायचे नव्हते. प्रकाश मेहरा यांनी माझ्या अगोदर अनेक अभिनेत्रींना या चित्रपटाची ऑफर दिली होती. मात्र, या चित्रपटासाठी सर्वच अभिनेत्रींनी नकार दिला होता. त्यावेळी प्रकाश मेहरा हे मला म्हणाले की, तुम्ही या चित्रपटाला नकार देऊ शकत नाहीत. 

आम्हाला खरोखरच तुमची गरज आहे. पुढे जया बच्चन म्हणाल्या, ज्यावेळी प्रकाश मेहरा यांनी चित्रपटासाठी मला फोर्स केला. त्यावेळी मी विचार केला की, चला त्यानिमित्त्याने तरीही मला आणि आमिताभ बच्चन यांना एकत्र वेळ घालता येईल. तो विचार डोळ्यासमोर ठेऊनच मी प्रकाश मेहरा यांना या चित्रपटासाठी होकार दिला.

मुळात म्हणजे अमिताभ बच्चन यांच्यासाठी जंजीर चित्रपट इतका लकी ठरला की, हा चित्रपट सुपरहिट ठरला. शिवाय जंजीर चित्रपटानंतरच अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचे लग्न देखील झाले. जंजीर चित्रपटाच्या यशानंतर कधीच अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये मागे वळून बघितले नाही. अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असतात.