जया यांचा अमिताभ बच्चन यांच्यावर थेट ‘हा’ आरोप, म्हणाल्या, माझ्यासोबत नाही तर गर्लफ्रेंडसोबतच…

| Updated on: Aug 11, 2024 | 12:17 PM

Amitabh Bachchan and Jaya Bachchan : जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांची जोडी कायमच चर्चेत असणारी आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच जया बच्चन या काैन बनेंगा करोडपतीच्या सेटवर पोहोचल्या होत्या. यावेळी आपल्या खासगी आयुष्याबद्दल अनेक मोठे खुलासे करताना जया बच्चन या दिसल्या होत्या.

जया यांचा अमिताभ बच्चन यांच्यावर थेट हा आरोप, म्हणाल्या, माझ्यासोबत नाही तर गर्लफ्रेंडसोबतच...
Jaya Bachchan and Amitabh Bachchan
Follow us on

बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन त्यांच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखल्या जातात. जया बच्चन  यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत. जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांची जोडी चाहत्यांना आवडते. मात्र, जया बच्चन यांच्यासोबत लग्न झाल्यानंतर रेखा या अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यात आल्या. अमिताभ बच्चन आणि रेखा यांचे मोठे किस्से कायमच चर्चेत राहिलेले आहेत. रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या अफेअरची चर्चा जया बच्चन यांच्यापर्यंत देखील पोहोचली होती. मात्र, हे सर्व प्रकरण जया बच्चन यांनी अत्यंत व्यवस्थित हाताळले.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा सुरू आहे. यादरम्यानच अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी दिलेली एक मुलाखत चांगलीच चर्चेत आल्याचे बघायला मिळतंय. या मुलाखतीमध्ये जया बच्चन या अमिताभ बच्चन यांच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल बोलताना दिसल्या आहेत. मात्र, जया बच्चन यांचे हे बोलणे ऐकून लोक चांगलेच हैराण झाल्याचे बघायला मिळतंय.

मुलाखतीमध्ये सिमी ग्रेवालने अमिताभ बच्चन यांना विचारले की, तुम्ही स्वत:ला रोमांटिक समजता का? यावर अमिताभ बच्चन यांनी नाही असे उत्तर दिले. अमिताभ बच्चन यांचे हे बोलणे ऐकून शेजारी बसलेल्या जया बच्चन या हसत हसत म्हणाल्या की, माझ्यासोबत नाही. यानंतर थेट सिमी ग्रेवालने रोमांटिक असण्याचा थेट अर्थच विचारला आहे.

जया बच्चन या म्हणाल्या की, रोमांटिक म्हणजे तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी काही फुले आणि वाईन आणू शकता. यावर अजिबात वेळ वाया न घालता अमिताभ बच्चन हे म्हणाले की, मी असे कधीच केले नाही. यावर जया बच्चन यांनी अमिताभ बच्चन यांना जोरदार उत्तर दिल्याचे बघायला मिळाले.

जया बच्चन या म्हणाल्या की, जर त्यांची कोणी गर्लफ्रेंड असती तर त्यांनी कदाचित असे केले आहे…पण…माझ्यासोबत असे कधीच केले नाही. यावर सिमीने पुढे विचारले की, ज्यावेळी तुम्ही डेटिंग करत होता, त्यावेळी कधी अमिताभ बच्चन हे रोमांटिक झाले होते? यावर जया बच्चन या थेट म्हणाल्या की, माझ्यासोबत कधीच नाही…