Tanisha Mukherjee Love Life : अभिनेत्री काजोलची बहीण तनिषा मुखर्जी सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. तिने बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण तिला यश मिळू शकले नाही. तिचे चित्रपट फारसे चालले नाहीत. तनिषा मुखर्जीचे बॉलिवूडमधील करिअर फ्लॉप ठरले. मात्र ती तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत होती. तनिषाचे अभिनेता उदय चोप्रासोबतही अफेअर होते.
सिद्धार्थ काननच्या पॉडकास्टमध्ये तनिषाने आपल्य़ा लव्ह लाईफबद्दल खुलासा केला आहे. ती म्हणाली की, ‘उदय आणि मी नील आणि निक्कीमध्ये एकत्र काम केले होते. या चित्रपटात आमची रोमँटिक दृश्ये होती. आम्ही दोघे एकमेकांना आधीच ओळखत होतो आणि या चित्रपटादरम्यान आम्ही दोघे रिलेशनशिपमध्ये आलो, त्यामुळे माझ्यासाठी असे होते की मी माझ्या बॉयफ्रेंडसोबत काम करत आहे. त्यामुळे ते सोपे झाले.
‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’मध्ये उदय आणि माझी भेट झाली होती. त्या काळात आम्ही दोघे मित्र होतो. त्यानंतर चित्रपटादरम्यान आम्ही जवळ आलो आणि एकत्र आलो. आम्ही दोघे २ वर्षे एकत्र होतो आणि नंतर वेगळे झालो. आम्ही आजही मित्र आहोत. कोणतेही ब्रेकअप कठीण असते, ते आमच्यासाठी त्यावेळीही होते.
तनिषा म्हणाली की, ‘माझा एक बॉयफ्रेंड होता जो खूपच पॉजेसिव्ह होता. त्यामुळे मी त्याला सोडले. अशा नात्यात मी जास्त काळ राहू शकत नाही. मी २ वर्षांनी त्याला सोडले. त्यानंतर आणखी एक होता, ज्याला मी ६ महिन्यांत बाय म्हटलं होतं. आम्ही कोणालाही बदलू शकत नाही. जर तुम्हाला आधीच माहित असेल की समोरची व्यक्ती आधीच उदास आहे, तर तुम्ही त्या नात्यात जाणे टाळावे. मात्र, रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर जेव्हा एखादी व्यक्ती काही कारणाने उदास होते, तेव्हा त्या नात्यात तुम्हाला किती द्यायचे आहे, याचा कॉल घ्यावा लागतो. याशिवाय तनिषाने असेही सांगितले की, तिचे कुटुंबीय आणि मित्रमंडळी तिच्या नात्याबद्दल फारसे ओपन नाहीत.