मुंबई : बिग बॉस 17 मध्ये धमाल होताना दिसतंय. नुकताच बिग बॉस 17 (Bigg Boss 17) मध्ये पहिला विकेंडचा वार पार पडलाय. विशेष म्हणजे सलमान खान हा घरातील सदस्यांचा चांगलाच क्लास लावताना दिसला. बिग बॉस (Bigg b0ss) 17 बद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळतंय. बिग बॉस 17 च्या पहिल्याच दिवशी घरातील सदस्यांमध्ये मोठा हंगामा झाल्याचे बघायला मिळाले. बिग बॉस 17 च्या प्रिमियरला सलमान खान हा धमाका करताना दिसला. यावेळी जबरदस्त डान्स सलमान खान याने केले.
बिग बॉस 17 च्या विकेंडच्या वारमध्ये कंगना राणावत, टायगर श्राॅफ हे त्यांच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी पोहचले. यावेळी कंगना राणावत हिने घरातील सदस्यांना एक जबरदस्त असा टास्क दिला. यावेळी घरातील सदस्य हे ऐकमेकांवर जोरदार आरोप करताना देखील दिसले. यावेळी अंकिता लोखंडे आणि मनारा चोप्रा यांच्यामध्येही वाद बघायल मिळाला.
मनारा हिच्या वाईट नजरेपासून ईशा हिला दूर ठेवायचे असल्याचे सांगताना अंकिता लोखंडे ही दिसली. इतकेच नाही तर यानंतर मनारा ही ईशावर काही आरोप करताना देखील दिसली. मनारा चोप्रा ही ईशावर भडकताना दिसली. अंकिता लोखंडे हिचे बोलणे ऐकून मनारा चोप्रा हिला नक्कीच मोठा धक्का बसला. ब्रेकमध्ये थेट मनारा चोप्रा ही रडताना देखील दिसली.
मनारा चोप्रा हिचा गेम प्रेक्षकांना आवडताना दिसतोय. मात्र, बिग बॉस 17 च्या घरात मनारा चोप्रा हिला टार्गेट केले जातंय. काही दिवसांपूर्वीच प्रियांका चोप्रा ही मनारा चोप्रा हिला सपोर्ट करताना दिसली. प्रियांका चोप्रा हिने सोशल मीडियावर एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. यावेळी तिने मनारा हिच्या लहाणपणीचा फोटो शेअर केला.
यावेळी प्रियांका चोप्रा हिने अत्यंत खास असे कॅप्शन देखील दिले. मुळात म्हणजे बिग बॉस 17 मध्ये ईशा आणि मनारा चोप्रा यांचे अजिबात जमत नसल्याचे दिसतंय. तर अंकिता लोखंडे ही ईशा हिला सपोर्ट करताना दिसते. मनारा याबद्दल अनेकदा अंकिता लोखंडे हिला बोलली देखील आहे. यावेळीचा विकेंडचा वार जबरदस्त ठरलाय.