स्वत:च्या निधनाचा स्टंट करणे पूनम पांडेला पडले महागात, थेट ‘या’ कंपनीने अभिनेत्रीला..

| Updated on: Feb 11, 2024 | 6:46 PM

पूनम पांडे ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. पूनम पांडे हिचे निधन झाल्याची एक पोस्ट सोशल मीडियावर शेअप करण्यात आली. यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. मात्र, पूनम पांडे हिनेच आपल्या निधनाची खोटी पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केली. यानंतर एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला.

स्वत:च्या निधनाचा स्टंट करणे पूनम पांडेला पडले महागात, थेट या कंपनीने अभिनेत्रीला..
Follow us on

मुंबई : पूनम पांडे हिच्या सोशल मीडियावरून एक पोस्ट शेअर करण्यात आली. ही पोस्ट पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला. असे सांगितले गेले की, पूनम पांडे हिचे निधन गर्भाशयातील कॅन्सरने झाले. यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. बऱ्याच बाॅलिवूड कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पूनम पांडे हिच्या निधनाचे दु:ख व्यक्त केले. पूनम पांडे हिच्यावर नेमका कुठे अंत्यसंस्कार होणार याबद्दल विविध चर्चा रंगताना दिसल्या. मुंबईमध्येच पूनम पांडेचे निधन झाल्याचे देखील सांगितले गेले.

पूनम पांडे हिच्यावर अंत्यसंस्कार नेमके कुठे होणार हे कळू शकले नव्हते. लोक सतत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना दिसले. पूनम पांडेने 24 तासानंतर एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. यामध्ये चक्क पूनम पांडे ही बोलताना दिसली. पूनम पांडे हिने थेट आपण जिवंत असल्याचे सांगत व्हिडीओ सुरू केला.

पूनम पांडे हिला पाहून सर्वजण हैराण झाले. या व्हिडीओमध्ये पूनम पांडे हिच्याकडून सांगण्यात आले की, फक्त आणि फक्त गर्भाशयातील कॅन्सरबद्दल लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आपण हे केले. हेच नाही तर या व्हिडीओमध्ये पूनम पांडे ही लोकांची माफी मागताना देखील दिसली. या व्हिडीओनंतर अनेकांनी तिच्यावर टिका करण्यास सुरूवात केली.

लोकांनी तर टिका केलीच, मात्र मोठा झटका आता पूनम पांडे हिला बसला आहे. थेट अमेरिकेतील फार्मास्‍यूटिकल कंपनी मर्कने भारतीय उपकंपनी असलेल्या एमएसडीने पूनम पांडेला मोठा झटका दिलाय. हा निधनाचा स्टंट करणे पूनम पांडे हिला महागात पडले. आता मोठा करार रद्द करण्यात आलाय.

क्रिएटिव्ह मार्केटिंग सोल्युशन्स एजन्सीसोबतचा तिचा करार संपवला आहे. विशेष म्हणजे ही तीच एजन्सी आहे जी मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेच्या या वादग्रस्त पब्लिसिटी स्टंटमध्ये सामील होती. आता हा मोठा झटकाच म्हणावा लागणार आहे. आपल्याच निधनाची खोटी बातमी पूनम पांडे हिने पसरली होती. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अनेकांनी पूनम पांडे हिचा चांगलाच समाचार घेतला.