भावाच्या लग्नासाठी प्रियांका चोप्रा मुंबईत, ‘देसी गर्ल’चा जबरदस्त लूक आणि साडी…

| Updated on: Aug 24, 2024 | 12:50 PM

अभिनेत्री प्रियांका चोप्रा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. प्रियांका चोप्राची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. प्रियांका चोप्रा ही सध्या हॉलिवूड चित्रपटांमध्ये धमाका करताना दिसत आहे. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना प्रियांका चोप्रा दिसते.

भावाच्या लग्नासाठी प्रियांका चोप्रा मुंबईत, देसी गर्लचा जबरदस्त लूक आणि साडी...
Priyanka Chopra
Follow us on

अभिनेत्री प्रियांका चोप्रा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. प्रियांका चोप्राची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. प्रियांका चोप्रा ही हॉलिवूड चित्रपटांमध्ये सध्या धमाका करताना दिसत आहे. पती निक जोनस याच्यासोबतच्या लग्नानंतर प्रियांका चोप्रा ही विदेशात शिफ्ट झालीये. प्रियांका चोप्रा ही नेहमीच मुलगी मालती मेरी हिच्यासोबतचे खास फोटो शेअर करताना दिसते. प्रियांका चोप्रा जरी लग्नानंतर विदेशात शिफ्ट झाली असली तरीही ती नेहमीच भारतात येताना दिसते. प्रियांका चोप्रा ही काही दिवसांपूर्वीच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नासाठी भारतात आली होती. विशेष म्हणजे या लग्नात धमाल करताना प्रियांका चोप्रा ही दिसली. धमाकेदार असा डान्सही तिने अनंतच्या लग्नात केला.

प्रियांका चोप्रा ही नुकताच आता परत भारतात आली. प्रियांका चोप्रा ही भाऊ सिद्धार्थ याच्या लग्नासाठी भारतात दाखल झाली. विशेष म्हणजे यावेळी लग्नाच्या फंक्शनमध्ये जाताना खास पोझ देताना प्रियांका चोप्रा ही दिसली. यावेळी जबरदस्त अशा लूकमध्ये दिसली. चाहत्यांना प्रियांका चोप्रा हिचा हा लूक जबरदस्त आवडलाय. 

प्रियांका चोप्रा यावेळी देसी लूकमध्ये दिसली. प्रियांका चोप्रा हिने शिमरी साडी घातली. बोल्ड आणि सुंदर लूकमध्ये प्रियांका चोप्रा स्पॉट झालीये. आता प्रियांका चोप्रा हिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहे.अभिनेत्रीने फोटोसाठी पापाराझी यांना पोझ देखील दिल्या. आता हेच फोटो व्हायरल होत आहेत.

लग्नाचे फंक्शन करून प्रियांका चोप्रा ही लगेचच विदेशात पती आणि मुलीकडे गेली. निक जोनस काही काम असल्याने या लग्नासाठी उपस्थित राहून शकला नाहीये. मात्र, प्रियांका चोप्रा ही भावाच्या लग्नासाठी पोहोचल्याचे बघायला मिळाले. प्रियांका चोप्रा ही मोठ्या संपत्तीची मालकीन आहे. प्रियांका चोप्राचे मुंबईमध्येही आलिशान घर आहे.

निक जोनस याच्यासोबत लग्न झाल्यापासून दोन ते तीन दिवसांसाठीच प्रियांका चोप्रा ही मुंबईमध्ये येते. प्रियांका चोप्रा हिने काही दिवसांपूर्वीच एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये प्रियांका चोप्रा ही मोठे खुलासे करताना दिसली. हेच नाही तर बॉलिवूडमधून आपल्याला कसे एका कोपऱ्यात ढकलण्याचे काम सुरू होते हे सांगताना प्रियांका चोप्रा ही दिसली होती.