अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने बॉलिवूड चित्रपटांनंतर आपला मोर्चा हा हॉलिवूड चित्रपटांकडे वळवला आहे. विशेष म्हणजे प्रियांका चोप्रा ही हॉलिवूड चित्रपटांमध्ये चांगलाच धमाका करताना दिसत आहे. निक जोनस याच्यासोबत लग्न केल्यापासून प्रियांका चोप्रा ही विदेशात शिफ्ट झालीये. मात्र, असे असतानाही आपल्या चाहत्यांच्या संपर्कात कायमच प्रियांका चोप्रा असते. चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना प्रियांका चोप्रा दिसते. काही दिवसांपूर्वीच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नासाठी भारतामध्ये पतीसोबत प्रियांका आली. विशेष म्हणजे या लग्नात धमाका करताना प्रियांका चोप्रा ही दिसली.
प्रियांका चोप्रा ही काही दिवसांपूर्वीच पती आणि मुलीसोबत समुद्रकिनारी खास वेळ घालवताना दिसली. आता नुकताच प्रियांका चोप्रा हिने काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. विशेष म्हणजे प्रियांका चोप्राने शेअर केलेले हे फोटो तिच्या चाहत्यांना जबरदस्त आवडल्याचे देखील बघायला मिळत आहे. एका फोटोमध्ये प्रियांका चोप्राची मुलगी मालती मेरी ही दिसत आहे.
प्रियांका चोप्रा हिने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये मालती ही तिच्या छोट्या छोट्या हाताने पोळी लाटताना दिसत आहे. लोकांना हाच फोटो प्रचंड आवडलाय. अनेकांनी म्हटले की, विदेशात असूनही प्रियांका चोप्रा काहीही झाले तरीही आपले संस्कार विसरत नाही. दुसऱ्या फोटोमध्ये कट केलेली भेंडी दिसत आहे.
अजून एका फोटोमध्ये प्रियांका चोप्रा हिची आई तिची आवडतीची भाजी भेंडी तयार करताना दिसत आहे. प्रियांका चोप्रा हिचे हे फोटो चाहत्यांना आवडत आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी प्रियांका चोप्रा ही मुलगी मालती हिला घेऊनही भारतात आली होती, यावेळी एअरपोर्टवरील काही फोटो व्हायरल होताना दिसले.
प्रियांका चोप्रा हिने एका मुलाखतीमध्ये बॉलिवूडबद्दल काही हैराण करणारे खुलासे केले होते. हेच नाही तर आपल्याला काम मिळू नये, यासाठी कसे प्रयत्न सुरू होते हे देखील थेट प्रियांका चोप्रा हिने सांगितले. एकप्रकारे प्रियांका चोप्रा हिने बॉलिवूडमधील काळे सत्यच सांगितले होते. प्रियांका चोप्रा हिच्या या मुलाखतीची चर्चा काही दिवस रंगताना दिसली.