प्रियांका चोप्राचा बिकिनीवर जबरदस्त लूक, पती निक जोनस आणि मुलगी मालतीही…

| Updated on: Jul 03, 2024 | 1:45 PM

अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही कायमच चर्चेत असते. फक्त बॉलिवूडच नाहीतर हॉलिवूडच्या चित्रपटांमध्येही धमाका करताना प्रियांका दिसलीये. प्रियांका चोप्राची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. प्रियांका चोप्रा मोठ्या संपत्तीची मालकीन देखील आहे.

प्रियांका चोप्राचा बिकिनीवर जबरदस्त लूक, पती निक जोनस आणि मुलगी मालतीही...
Priyanka Chopra
Follow us on

अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. निक जोनस याच्यासोबत लग्न झाल्यापासून प्रियांका चोप्रा ही विदेशातच आहे. काही दिवसांपूर्वी प्रियांका चोप्रा ही भारतात आली होती. यावेळी खास फोटो शेअर करत प्रियांका चोप्रा हिने म्हटले होते की, मुंबई मेरी जान. विशेष म्हणजे मुलगी मालती हिला घेऊन प्रियांका भारतात आली होती. प्रियांका चोप्रा ही हॉलिवूड चित्रपटांच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. काही दिवसांपूर्वीच प्रियांका चोप्रा हिने चित्रपटाच्या शूटिंगच्यावेळीचे काही फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते.

सध्या प्रियांका चोप्रा हिने कामामधून थोडा ब्रेक घेतला आहे. प्रियांका चोप्रा पती निक जोनस आणि मुलगी मालती मेरीसोबत चांगला वेळ घालवताना दिसत आहे. प्रियांका ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट बीचवर व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. याचे काही खास फोटोही प्रियांका चोप्रा हिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी जबरदस्त लूकमध्ये प्रियांका दिसली आहे.

फोटोंमध्ये प्रियांका चोप्रा हिने ब्लॅक अँड व्हाइट बिकिनी घातल्याचे दिसतंय. विशेष म्हणजे यावेळी अत्यंत बोल्ड लूकमध्ये प्रियांका दिसत आहे. हेच नाहीतर या लूकसोबतच प्रियांकाने मॅचिंग कॅप आणि सनग्लासेससह कॅरी केले आहेत. निक जोनस हा काळ्या रंगाचा शर्ट आणि शॉर्ट्समध्ये दिसत आहे. दोघेही खास वेळ घालवताना दिसत आहेत.

फोटोमध्ये प्रियांका चोप्राची मुलगी मालती मेरी ही बीचवर खेळताना दिसत आहे. विशेष म्हणजे मालती खूपच जास्त क्यूट दिसत आहे. हे फोटो आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. चाहते हे या फोटोवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत. अनेकांनी सुंदर फॅमिली असल्याचे कमेंट करत म्हटले आहे.

प्रियांका चोप्रा कायमच शूटिंगमधून वेळ काढून कुटुंबासोबत चांगला वेळ घालवताना दिसते. प्रियांका चोप्रा ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते. विदेशात राहत असली तरीही प्रियांका चोप्रा आपल्या चाहत्यांसोबत प्रत्येक अपडेट शेअर करताना दिसते. प्रियांका चोप्रा ही मोठ्या संपत्तीची मालकीन देखील आहे. प्रियांका चोप्रा खास फोटो आणि व्गिडीओ शेअर करताना दिसते.