मुंबई : राखी सावंत ही नेहमीच चर्चेत असते. राखी कधी काय बोलेल याचा अंदाजा बांधणे खूप अवघड आहे. राखी सावंत (Rakhi Sawant) हिने काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करत सर्वांनाच मोठा धक्का दिला होता. राखी सावंत हिने शेअर केलेले फोटो आणि व्हिडीओ हे तिच्या लग्नाचे होते. आदिल दुर्रानी (Adil Durrani) नावाच्या व्यक्तीसोबत राखी सावंत हिने लग्न केले. विशेष म्हणजे अगोदर कोर्टामध्ये लग्न आणि नंतर निकाह तिने केला. लग्नानंतर आपले नाव फातिमा आदिल दुर्रानी असल्याचे सांगताना देखील राखी सावंत ही दिसली होती. लग्नाच्या (Marriage) काही महिन्यांनंतर राखी सावंत आणि आदिल यांच्यामध्ये वाद झाला.
राखी सावंत हिने आदिल दुर्रानी याच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले. आदिल दुर्रानी आणि राखी यांच्यामधील वाद हा थेट कोर्टात पोहचला. आदिल दुर्रानी हा सध्या जेलमध्ये आहे. आदिल दुर्रानी याने फक्त बिग बाॅसमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत लग्न केल्याचा देखील धक्कादायक खुलासा हा राखी सावंत हिने केला आहे.
नुकताच पापाराझी यांच्यासमोर राखी सावंत हिने मोठे भाष्य केले आहे. राखी सावंत म्हणाली की, मी अशा एका व्यक्तीच्या शोधात आहे जो माझ्या दोन लेकरांचा बाप होऊ शकतो आणि आयुष्यभर माझी साथ देऊ शकतो. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, राखी सावंत हिची लव्ह लाईफ ही सुरूवातीपासूनच खास ठरली नाहीये.
राखी सावंत पुढे म्हणाली की, योग्य जीवनसाथीला शोधण्यासाठी मला स्वयंवरची गरज आहे. तुम्ही सर्वांनी माझा स्वयंवर भाग 2 लाँच करावा हवा असेही म्हणताना राखी सावंत ही दिसत आहे. या स्वयंवरची थीमबद्दल देखील बोलताना राखी सावंत ही दिसत आहे. राखी म्हणाली की, माझ्या स्वयंवरची थीम ही राखी सावंतच्या लेकरांचा बाप कोण होणार? ही असावी.
काही दिवसांपूर्वीच पापाराझी यांना बोलताना राखी सावंत ही म्हणाली होती की, माझे काम खूप जास्त वाढले आहे. मी एकटी काय काय करणार नाही. यासाठी मला एका जोडीदाराची खूप जास्त गरज आहे. मी आता आदिल दुर्रानी याच्या सुटण्याची वाट पाहत आहे. कारण मला आता आदिल दुर्रानी याच्यासोबत लवकर घटस्फोट घ्यायचा आहे आणि दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न करायचे आहे. आता राखी कोणासोबत लग्न करते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.