मुंबई | 07 फेब्रुवारी 2024 : अभिनेत्री रश्मिका मंदाना कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. सध्या अभिनेत्री ‘ॲनिमल’ सिनेमामुळे तुफान चर्चेत आहे. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर देखील दमदार कमाई केली. ‘ॲनिमल’ सिनेमाच्या यशानंतर रश्मिका हिने देखील तिच्या मानधनात वाढ केल्याची चर्चा जोर धरु लागली आहे. सोशल मीडियावर फक्त आणि फक्त रश्मिका हिच्या मानधनाची चर्चा रंगली आहे. दरम्यान, यावर रश्मिका हिने स्पष्टीकरण दिलं आहे. ‘ॲनिमल’च्या यशानंतर रश्मिकाने तिची फी वाढवली आणि एका सिनेमासाठी 4 ते 4.5 कोटी रुपयांची मागणी करायला सुरुवात केली, अशी चर्चा सुरु आहे. पण आता तिने या अफवांवर प्रतिक्रिया दिली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टवर प्रतिक्रिया देत अभिनेत्री म्हणाली, ‘कोण हे सर्व बोलत आहे, यासाठी मी हैराण आहे. हे सर्व पाहिल्यानंतर मला खरंच यावर विचार करायला हवा असं वाटत आहे. जर माझ्या निर्मात्यांनी मला विचारलं असं का ? तर मी त्यांना सांगेल मीडिया बोलत आहे सर, मी नाही… आणि मला असं वाटतं मी त्यांचं ऐकायला हलं… मी असं करु ना?’ असा उलट प्रश्न रश्मिका हिने चाहत्यांना विचारला आहे.
BUZZ⚠️#RashmikaMandanna Increased her Remuneration again after #Animal success 🏃
From inside reports, Currently she’s charging around 4Cr – 4.5cr per film pic.twitter.com/amyyz5iTEP
— Filmy Bowl (@FilmyBowl) February 6, 2024
सांगायचं झालं तर, रश्मिका हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. पण ‘ॲनिमल’ सिनेमाच्या यशानंतर रश्मिका हिच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीमध्ये मोठी वाढ झाली आहे. ‘ॲनिमल’ सिनेमात रश्मिका हिच्यासोबत, रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल, तृप्ती डिमरी यांनी महत्त्वाची भूमिका साकारली. सिनेमातील रणबीर आणि तृप्ती यांच्या इंटिमेट सीनमुळे वाद निर्माण झाले. पण कोणत्याही वादाचा आणि विरोधाचा परिणाम सिनेमाच्या बॉक्स ऑफिसवर झाला नाही.
‘ॲनिमल’ सिनेमाच्या यशानंतर रश्मिका हिच्या आगामी सिनेमांद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री लवकरच अभिनेता अल्लू अर्जुन याच्यासोबत ‘पुष्पा 2’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. 15 ऑगस्त 2024 रोजी सिनेमो मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. ‘पुष्पा’ सिनेमाच्या यशानंतर ‘पुष्पा 2’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती कोटी रुपयांची कमाई करेल पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
रश्मिका हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीला असंख्य चाहते फॉलो करतात. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.