‘त्या’ व्हिडिओवर रश्मिका मंदाना हिचे मोठे विधान, थेट म्हणाली, या गोष्टी हाताळणे…

| Updated on: Nov 06, 2023 | 4:55 PM

रश्मिका मंदाना ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. रश्मिका मंदाना हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. रश्मिका मंदाना हिचा एक फेक व्हिडीओ व्हायरल झाल्याने मोठी खळबळ निर्माण झालीये.

त्या व्हिडिओवर रश्मिका मंदाना हिचे मोठे विधान, थेट म्हणाली, या गोष्टी हाताळणे...
Follow us on

मुंबई : अभिनेत्री रश्मिका मंदाना हिच्या व्हायरल होणाऱ्या फेक व्हिडीओमुळे मोठी खळबळ निर्माण झाली. अनेकांनी यावर थेट संताप हा व्यक्त केलाय. अमिताभ बच्चन यांनी देखील घडलेल्या प्रकारावर नाराजी व्यक्त केली. चाहत्यांनी तर या प्रकारानंतर रश्मिका मंदाना हिला कायदेशीर कारवाई करण्याचा थेट सल्ला दिला. व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून लोक हैराण झाल्याचे बघायला मिळाले. सोशल मीडियावर रश्मिका मंदाना हिचा तो फेक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय.

आता या फेक व्हिडीओनंतर रश्मिका मंदाना हिने पहिल्यांदाच भाष्य केले. रश्मिका मंदाना हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत थेट म्हटले की, हे शेअर केल्यानंतर मी खरोखरच खूप जास्त दुखावले गेले आहे. माझ्याबद्दलचा एक डीपनेक व्हिडीओ आॅनलाईन व्हायरल केला जातोय.

मला आता त्यावर बोलायचे आहे. हे फक्त माझ्यासाठीच नाहीये. तंत्रज्ञानाचा कसा दुरुपयोग केला जातोय आणि हे आपल्यापैकी प्रत्येकासाठीच खूप जास्त भीतीदायक आहे. मी आज एक महिला आणि अभिनेत्री आहे म्हणून माझे कुटुंबिय, मित्र आणि माझे सर्व हितचिंतक माझ्यासोबत आहेत आणि माझे संरक्षण करत आहे.

परंतू जर मी काॅलेज आणि शाळेमध्ये असते आणि माझ्यासोबत त्यावेळी असे घडले असते तर मी कदाचित या गोष्टी हाताळू देखील शकले नसते. मी खरोखरच याबद्दल कल्पना देखील अजिबातच करू शकत नाही. आपल्यापैकी अधिक लोकांना अशा चोरीचा परिणाम होण्याआधी एक समुदाय म्हणून तातडीने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

आता रश्मिका मंदाना हिने शेअर केलेली ही पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसत आहे. व्हायरल होणाऱ्या या फेक व्हिडीओनंतर चाहते हे रश्मिका मंदाना हिच्या समर्थनार्थ मैदानात उतल्याचे बघायला मिळत आहेत. अमिताभ बच्चन यांनी देखील कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केलीये. साऊथचे स्टार देखील रश्मिका मंदाना हिच्या सपोर्ट करताना दिसत आहेत.