मुंबई : व्हॉट इंडिया थिंक्स टुडेचे आता दुसरे पर्व लवकरच सुरू होतंय. 25 फेब्रुवारी 2024 पासून ते 27 फेब्रुवारीपर्यंत हा कॉन्क्लेव असेल. गेल्या काही दिवसांपासून याची जोरदार तयारी ही बघायला मिळतंय. आता ही तयारी नक्कीच अंतिम टप्यात आलीये. या व्हॉट इंडिया थिंक्स टुडेला अनेक बाॅलिवूड कलाकार हे हजेरी लावणार आहेत. यावेळी ते थेट संवाद साधताना देखील दिसणार आहेत. फक्त बाॅलिवूड कलाकारच नाही तर अनेक नामांकित व्यक्ती देखील हजेरी लावणार आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील व्हॉट इंडिया थिंक्स टुडेला हजेरी लावणार आहेत. राजकिय मंडळींची देखील मांदियाळी बघायला मिळेल.
विशेष म्हणजे फक्त कोणत्याच एकाच क्षेत्रातील नव्हे तर विविध क्षेत्रातील व्यक्ती या कॉन्क्लेवमध्ये सहभागी होणार आहेत. हे कॉन्क्लेव 3 दिन चालणार आहे. या कॉन्क्लेवची थीम ही इंडिया: पॉइज्ड फॉर दि नेक्स्ट बिग लीप आहे. काही बाॅलिवूड अभिनेत्री देखील या कॉन्क्लेवमध्ये सहभागी होऊन दिलखुलास चर्चा करणार आहेत. अभिनेत्री रवीना टंडन ही देखील या कॉन्क्लेवमध्ये सहभागी होणार आहे.
अभिनेत्री रवीना टंडन ही कायमच चर्चेत असते. रवीना टंडन हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. अनेक हिट चित्रपटे रवीना टंडन हिने दिली आहेत. रवीना टंडन हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. विशेष म्हणजे या कॉन्क्लेवमध्ये रवीना टंडन ही तिच्या पर्सनल लाईफबद्दल देखील बोलताना दिसणार आहे.
रवीना टंडन ही तिच्या यशाचे रहस्य सांगताना देखील दिसेल. कॉन्क्लेवच्या पहिल्याच दिवशी अर्थात 25 फेब्रुवारी 2024 रोजी रवीना टंडन ही सहभागी होईल. 90 च्या दशकात रवीना टंडन हिने धमाकेदार चित्रपट केले आहेत. महिला सशक्तीकरणाबाबतही रवीना टंडन सक्रिय असते. कोणताही सामाजिक विषय असल्यावर आपले मत जाहिरपणे ठेवतात रवीना टंडन दिसते.
हेच नाही तर रवीना टंडनला उत्कृष्ट अभिनयासाठी अनेकदा थेट फिल्मफेअर आणि राष्ट्रीय पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे. रवीना टंडन ही गेल्या काही दिवसांपासून तशी अभिनयापासून दूरच आहे. मात्र, असे असतानाही रवीना टंडन ही कायमच चर्चेत असते. रवीना टंडनची लेक लवकरच बाॅलिवूडमध्ये पर्दापण करणार असल्याचे देखील सांगितले जाते.