Alia Batt नंतर ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीकडून प्रेग्नेंसीची घोषणा; नवीन वर्षी चाहत्यांना ‘गुडन्यूज’

| Updated on: Jan 01, 2023 | 12:11 PM

आलिया भट्टनंतर 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीने लग्नाच्या तीन महिन्यांनंतर केली प्रेग्नेंसी घोषणा, व्हिडीओ व्हायरल

Alia Batt नंतर या प्रसिद्ध अभिनेत्रीकडून प्रेग्नेंसीची घोषणा; नवीन वर्षी चाहत्यांना गुडन्यूज
Alia Batt नंतर 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीकडून प्रेग्नेंसीची घोषणा; नवीन वर्षी चाहत्यांना 'गुडन्यूज'
Follow us on

Actress Shamna Kasim Pregnancy : अभिनेत्री आलिया भट्टने (Alia Bhatt)लग्नाच्या दोन महिन्यांनंतर प्रेग्नेंस असल्याची घोषणा इन्स्टाग्रामवर सोनोग्राफीचा फोटो पोस्ट करत चाहत्यांना दिली. आलियाना ६ नोव्हेंबर २०२२ रोजी गोंडस मुलीला जन्म दिला. आलिया आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या लेकीचं राहा असं आहे. आलियानंतर आता दाक्षिणात्य सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री शमना कासिमने (Shamna Kasim Pregnancy) लग्नाच्या तीन महिन्यांनंतर चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

शमना कासिमने नुकताच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. अभिनेत्रीने बेबी बंप दाखवत इन्स्टाग्रावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. सध्या अभिनेत्रीचा व्हिडीओ सर्वत्र तुफान व्हायरल होत आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अभिनेत्री चाहत्यांना आनंदाची बातमी दिल्यामुळे तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

हे सुद्धा वाचा

 

शमना कासिमने २४ ऑक्टोबर २०२२ मध्ये उद्योगपती शनिद आसिफ अलीसोबत लग्न केलं. खुद्द शमनाने तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत, चाहत्यांना लग्नाची माहिती दिली. दुबईमध्ये मोठ्या थाटात शमना आणि शनिद यांचं लग्न झालं.

शमना आणि शनिद यांची केमिस्ट्री पाहून चाहत्यांना प्रचंड आनंद झाला. शमनाचा पती प्रसिद्ध उद्योगपती आहे. एवढंच नाही, तर शनिद गडगंज संपत्तीचा मालक आहे. शनिदने पत्नीला १.३० कोटी रुपयांचं सोनं आणि ३० कोटी रुपयांचा बंगला भेट म्हणून दिला. आता दोघांच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. म्हणून शमना आणि शनिद यांच्यासोबतच कुटुंब आणि चाहते देखील प्रचंड आनंदी आहेत.