अभिनेत्री शर्लिन चोप्रा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. शर्लिन चोप्राची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. शर्लिन चोप्रा ही तिच्या विधानांमुळे चर्चेत असते. अनेक हीट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका शर्लिन चोप्राने केल्या आहेत. शर्लिन चोप्रा ही काही दिवसांपूर्वीच राखी सावंत हिच्यावर गंभीर आरोप करताना दिसली. फक्त राखी सावंत हीच नाही तर शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रावरही तिने गंभीर आरोप केले. फक्त आरोपच नाही तर राज कुंद्रा आणि शर्लिन चोप्रा यांचे प्रकरण थेट पोलिसांपर्यंत पोहोचले. शर्लिन चोप्रा ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते.
शर्लिन चोप्रा ही नुकताच गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचली होती. यावेळी शर्लिन चोप्रा हिने सांगितले की, तिने बाप्पा जवळ काय मागितले. शर्लिन चोप्रा म्हणाली की, यावर्षी मी बाप्पाला माझ्या स्वत:साठी काहीतरी मागितले आहे. मी बाप्पाला म्हटले की, यावर्षी मला आई होण्याचे सुख दे. माझी गेल्या कित्येक वर्षांपासून इच्छा आहे की, मी आई व्हावे.
आता माझी ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे आणि मी आई होणार आहे. शर्लिन चोप्रा हिचे नाव अनेक लोकांशी जोडले गेले आहे. मात्र, शर्लिन चोप्रा हिने अजूनही लग्न केले नाहीये. शर्लिन चोप्रा ही 40 वर्षांची अजून तिने लग्न न होताच आई होण्याची इच्छा व्यक्त केलीये. हेच नाही तर आपण लवकरच आई होणार असल्याचेही तिने थेट म्हटले.
शर्लिन चोप्रा हिचे बोलणे ऐकून लोकांना मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळतंय. शर्लिन चोप्रा हिच्या विधानाच्या आता विविध चर्चा या रंगताना देखील दिसत आहेत. अनेकांनी म्हटले की, लग्न न करण्याच्या अगोदरच हिला आई व्हायचे आहे. दुसऱ्याने लिहिले की, प्रेग्नंट राहिल्यानंतर बाळाच्या वडिलांचे नाव सर्वात अगोदर जाहीर कर.
शर्लिन चोप्रा ही सोशल मीडियावर सक्रिय असते. चाहत्यांसाठी कायमच बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना शर्लिन चोप्रा ही दिसते. शर्लिन चोप्रा ही मोठ्या संपत्तीची मालकीन आहे. काही दिवसांपूर्वीच आपल्या एक्स बॉयफ्रेंडबद्दल खुलासा करताना शर्लिन चोप्रा ही दिसली. हेच नाही तर एक्स बॉयफ्रेंडवर गंभीर आरोप करताना शर्लिन चोप्रा दिसली.