अभिनेत्री श्वेता तिवारी ही चांगलीच चर्चेत आलीये. गेल्या काही दिवसांपासून श्वेता तिवारी ही आपल्या खासगी आयुष्याबद्दल खुलासे करताना दिसत आहे. श्वेता तिवारीने मोठा काळ मालिकांमध्ये गाजवला आहे. फक्त मालिकाच नाही तर बिग बॉसची विजेता देखील श्वेता तिवारी आहे. श्वेता तिवारी ही 43 वर्षांची असून जबरदस्त लूकमध्ये दिसते. कायमच आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करतानाही श्वेता तिवारी दिसते. श्वेता तिवारीने मोठा काळ मालिकांमध्ये गाजवला. काही दिवसांपूर्वीच एका वेब सीरिजमध्ये धमाका करताना श्वेता तिवारी ही दिसली. श्वेता तिवारी हिने नुकताच तिची लेक पलक तिवारीबद्दल मोठे भाष्य केले आहे.
काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये श्वेता तिवारी हिच्याकडून स्पष्ट करण्यात आले की, माझी इच्छा आहे की, माझ्या मुलीने लग्न करून नये. कारण मी स्वत: लग्न केल्यानंतर बऱ्याच गोष्टी सहन केल्या त्या गोष्टी तिच्या नशिबात येऊ नये, ही माझी इच्छा आहे. लग्न करण्याच्या अगोदर तिने दोन वेळा विचार करावा.
गेल्या काही दिवसांपासून श्वेता तिवारी हिच्या लेकीचे नाव इब्राहिम अली खान याच्यासोबत जोडले जात आहे. आता यावर बोलताना श्वेता तिवारी ही दिसली आहे. श्वेता तिवारी म्हणाली की, नेहमीच पलकच्या अफेअरच्या वेगवेगळ्या चर्चा सुरू असतात. मात्र, त्या चर्चांचा तिच्यावर काहीच परिणाम होत नाही, त्या चर्चांचा माझ्यावर नक्कीच परिणाम होतो.
ती यासर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करते. सध्या ती सहन करते. मात्र, पुढेही ती करेलच असे नाही. मजाकमध्ये ती माझ्याकडे येऊन बऱ्याचदा म्हणते की, मी या मुलाला डेटिंग करत आहे…मी तिला म्हणते हे कधीपासून सुरू आहे…त्यावर ती मला म्हणते की, मलाही माहिती नाही आणि त्या मुलाला मी एकदाही भेटले नाहीये.
कदाचित ज्यांनी यावर लिहिले आहे, त्यांनाच माहिती असावे. काही दिवसांपूर्वीच पलक तिवारी हिचे काही फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. हेच नाही तर पलक तिवारी आणि इब्राहिम अली खान हे काही दिवसांपूर्वीच चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये पोहोचले होते. ज्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसले.