श्वेता तिवारी हिने लग्नाबद्दल लेकीला दिला थेट ‘हा’ अत्यंत मोठा सल्ला, लग्न करण्याच्या अगोदर दोनदा…

| Updated on: Aug 06, 2024 | 5:43 PM

श्वेता तिवारी ही फक्त तिच्या अभिनयामुळेच नाही तर तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असते. श्वेता तिवारीने लग्नाबद्दल मोठा खुलासा केलाय. श्वेता तिवारी हिचे दोनदा लग्न झाले. पहिल्या पतीवर गंभीर आरोप करतानाही श्वेता तिवारी दिसली. आता तिने लेकीला मोठा सल्ला दिल्याचे बघायला मिळतंय.

श्वेता तिवारी हिने लग्नाबद्दल लेकीला दिला थेट हा अत्यंत मोठा सल्ला, लग्न करण्याच्या अगोदर दोनदा...
Shweta Tiwari
Follow us on

श्वेता तिवारी हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. श्वेता तिवारीची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. श्वेता तिवारी हिने अभिनय क्षेत्रामध्ये मोठा काळ गाजवला आहे. विशेष म्हणजे मालिकांनंतर आता श्वेता तिवारी हिने तिचा मोर्चा हा वेब सीरिजकडे वळवला आहे. श्वेता तिवारी ही मोठ्या संपत्तीची मालकीन आहे. श्वेता तिवारी ही फक्त तिच्या अभिनयामुळेच नाही तर तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असते. श्वेता तिवारी ही तिच्यापेक्षा 12 वर्षाने लहान असलेल्या अभिनेत्याला डेट करत असल्याची चर्चा सुरू होती. हेच नाही तर यांचे काही फोटोही व्हायरल होताना दिसले. मात्र, त्यावर श्वेताने काहीच भाष्य केले नाही.

श्वेता तिवारी हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये ती चक्क लग्नाबद्दल बोलताना दिसली. दोन घटस्फोटानंतर श्वेता तिवारी हिचा विश्वास लग्नावर नसल्याचे तिच्या बोलण्यावरून स्पष्ट दिसत आहे. श्वेता तिवारी हिने लग्नाबद्दल तिच्या मुलीलाच मोठा सल्ला दिलाय. हा सल्ला दुसरा तिसरा कोणताही नसून लग्न न करण्याचा आहे.

श्वेता तिवारी हिचे लग्न राजा चाैधरी याच्यासोबत झाले. राजा चाैधरी आणि श्वेताची एक मुलगी देखील आहे. राजा चाैधरीच्या घटस्फोटानंतर ती परत एकदा प्रेमात पडली. श्वेता तिवारी हिने अभिनव कोहली याच्यासोबत लग्न केले. अभिनव आणि श्वेताच्या मुलाचे नाव रेयांश आहे. आता श्वेता तिवारी आपल्या दोन्ही लेकरांचे संगोपन एकटीच करते.

श्वेता तिवारी म्हणाली की, मी माझ्या मुलीला लग्न न करण्याचा सल्ला दिलाय. तरी तिला लग्न करण्याची इच्छा असेल तर तिने त्या गोष्टीचा किमान दोन वेळा विचार करावा. श्वेता तिवारी म्हणाली की, राजा चाैधरी याच्यासोबतचे लग्न वाचवण्यासाठी मी खूप जास्त प्रयत्न केला. दुसऱ्या लग्नानंतर बऱ्याच गोष्टी खूप जास्त वाईट झाल्या. यामुळे त्या नात्यामध्ये राहण्याचा काहीच प्रश्न नव्हता.

श्वेता तिवारी हिने राजा चाैधरी याच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. हेच नाही तर दारू पिऊन आपल्याला राजा मारत असल्याचेही तिने म्हटले होते. श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी ही सैफ अली खान याचा मुलगा इब्राहिम अली खान याला डेट करत असल्याचे सांगितले जातंय. दोघे कायमच एकसोबत स्पॉट होताना दिसतात. मात्र, त्यांनी त्यांच्या नात्यावर भाष्य केले नाहीये.