बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावरही सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना सोनाक्षी सिन्हा दिसते. सोनाक्षीने गेल्याच महिन्यात झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले. विशेष म्हणजे झहीर इक्बाल आणि सोनाक्षीने काही वर्ष डेट केल्यानंतर लग्न केले. झहीरसोबतच्या लग्नाला तिच्या घरच्यांचा विरोध होता, असे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले. लग्नानंतर सोशल मीडियावर खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना सोनाक्षी दिसत आहे. अनेक हीट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका आतापर्यंतच्या करिअरमध्ये सोनाक्षीने केल्या आहेत.
झहीर इक्बाल याच्यासोबतच्या लग्नानंतर सोनाक्षी सिन्हा हिचे दोन्ही भाऊ लव आणि कुश यांनी सोनाक्षी हिच्यासोबत सर्व नाते तोडल्याचे सांगितले जाते. हेच नाहीतर लग्नामध्ये लव आणि कुश उपस्थित नव्हते. काही दिवसांपूर्वीच लव सिन्हा याने सोशल मीडियावर सोनाक्षीच्या सासऱ्यांच्या विरोधात एक पोस्ट शेअर केली होती. मात्र, थोड्यावेळातच त्याने ही पोस्ट डिलीट केली.
आता नुकताच एक मुलाखत सोनाक्षी सिन्हा हिने दिली. या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे करताना सोनाक्षी सिन्हा ही दिसली. सोनाक्षी सिन्हा ही म्हणाली की, मी झहीर इक्बाल याला प्रपोज केला होता. तो प्रपोज लग्नासाठी होता. पहिल्यांदाच आपल्या आणि झहीरच्या खासगी आयुष्याबद्दल बोलताना सोनाक्षी सिन्हा ही दिसली आहे.
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी अत्यंत जवळच्या व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये अगोदर सिव्हिल मॅरेज केले आणि त्यानंतर त्यांनी मोठ्या जंगी पार्टीचे आयोजन केले. लग्नात सही करताना सोनाक्षी सिन्हा हिने वडील शत्रुघ्न सिन्हा यांचा हात पकडल्याचे काही फोटोंमध्ये स्पष्ट दिसत होते. सोनाक्षी सिन्हा हिची आई देखील तिथेच उपस्थित होती.
सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नात अनेक हिंदू रितीरिवाज पार पडले. ज्याचेही फोटो व्हायरल होताना दिसले. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाला बॉलिवूडचे अनेक मोठे कलाकार उपस्थित होते. आपल्याच लग्नात झहीर इक्बाल याच्यासोबत खास डान्स करतानाही सोनाक्षी सिन्हा दिसली. सोनाक्षी सिन्हा मोठ्या संपत्तीची मालकीन देखील आहे.