मुंबई : प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सुलोचना दीदी लाटकर (Sulochana Latkar) यांनी रविवारी शेवटचा श्वास घेतला. सुलोचना दीदी यांनी एक अत्यंत मोठा काळ हा बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. बाॅलिवूडच्या 250 आणि मराठीच्या 50 चित्रपटांमध्ये त्यांनी महत्वाच्या भूमिका केल्या. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत सतत खराब राहत होती. मार्च महिन्यात त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सुलोचन दीदी यांच्या उपचाराचा खर्च उचलणार असल्याचे जाहिर केले होते. सुलोचना दीदी यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट (Movie) केले आहेत. अमिताभ बच्चन यांच्यासोबत देखील त्यांनी काम केले.
आज सुलोचना दीदी यांच्या राहत्या घरी प्रभादेवी येथे त्यांचे पार्थिव हे दर्शनासाठी ठेवण्यात आले. राजकीय क्षेत्र, सिनेसृष्टी क्षेत्र अशा विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी सुलोचना दीदी यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर शासकीय इतमामात दादर येथील स्मशानभूमीत सुलोचना दीदी यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार झाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दाैऱ्यावर होते. मात्र, त्यांना सुलोचना दीदी यांची निधनाची बातमी समजताच ते मुंबईकडे रवाना झाले. सुलोचना दीदी यांच्या अंत्यसंस्काराच्यावेळी मराठी, हिंदी मनोरंजन क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. सुलोचना दीदी यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता.
सुलोचना दीदी यांनी बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरूवात ही केली होती. वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी त्यांचे लग्न करण्यात आले. सुलोचना दीदी यांना एक मुलगी आहे. सुलोचना दीदी यांनी बाॅलिवूड चित्रपटांमध्ये काम मिळवण्यासाठी मोठा संघर्ष केला. आजही मोठा चाहता वर्ग हा सुलोचना दीदी यांचा आहे. सुलोचना दीदी यांच्या निधनाची बातमी कळताच राजकिय नेत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.
3 जून रोजी सुलोचना दीदी यांची तब्येत बिघडल्याने त्यांना थेट व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. व्हेंटिलेटरवर ठेऊनही त्यांच्या तब्येतीमध्ये काही सुधारणा झाली नाही. त्यांना श्वासोच्छवासाची समस्या होती. मराठा तितुका मेळावा, मोलकरीण, बाळा जो र, सांगते ऐका, सासुरवास अशा चित्रपटांमध्ये हिट भूमिका या सुलोचना दीदी यांनी केल्या आहेत. सुलोचना दीदी यांनी अनेक चित्रपटांमध्ये आईची भूमिका केली आहे.