मुंबई : उर्फी जावेद ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. उर्फी जावेद (Uorfi Javed) हिने एक मोठा काळ टीव्ही मालिकांमध्ये गाजवलाय. उर्फी जावेद हिने आपल्या करिअरची सुरूवात टीव्ही मालिकांपासूनच केलीये. उर्फी जावेद हिची आज सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग (Fan following) ही बघायला मिळते. उर्फी जावेद नेहमीच तिच्या कपड्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात देखील सापडते. उर्फी जावेद आणि वाद हे समीकरण बघायला मिळतंय. उर्फी जावेद कधी काय घालेल याचा अजिबात नेम नाही.
उर्फी जावेद हिने काही दिवसांपूर्वीच एक अतरंगी असा लूक केला. यावेळी चक्क गुलाबी रंगाच्या सात शर्टपासून तिने ड्रेस तयार केला. उर्फी जावेद हिचा हा लूक पाहून लोक हैराण झाल्याचे बघायला मिळाले. उर्फी जावेद ही काही दिवसांपूर्वीच शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याच्यावर टिका करताना दिसली. यावेळी तिने थेट पाॅर्न किंग म्हटले.
नुकताच उर्फी जावेद ही एक अतरंगी लूकमध्ये दिसलीये. उर्फी जावेद हिचा हा लूक पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसल्याचे दिसतंय. उर्फी जावेद ही थेट पिंक ओवरकोट ड्रेसमध्ये दिसलीये. हा ड्रेस मॅजिक असल्याचे सांगताना देखील उर्फी जावेद ही दिसलीये. उर्फी जावेद हिचा हा लूक लोकांना अजिबातच आवडला नाहीये.
उर्फी जावेद ही पापाराझी यांना फोटोसाठी विविध पोझ देताना देखील दिसली. उर्फी जावेद हिच्या या नव्या लूकचे फोटो तूफान व्हायरल होताना दिसतंय. लोक या लूकनंतर उर्फी जावेद हिची मजाक उडवताना दिसत आहेत. उर्फी जावेद ही नेहमीच काहीतरी अतरंगी करताना दिसते. काही दिवसांपूर्वी चक्क झाडाच्या सालापासून तिने ड्रेस तयार केला.
आता एकाने उर्फी जावेद हिच्या या फोटोंवर कमेंट करत थेट म्हटले की, आता हेच बघायचे राहिले होते उर्फी. दुसऱ्याने लिहिले की, आजचा उर्फी जावेदचा लूक पाहून लहान मुले नक्कीच खुश होती. तिसऱ्याने लिहिले की, मला तर हा लूक अजिबातच आवडला नाहीये. उर्फी जावेद हिच्या या फोटोवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.