घटस्फोटाबद्दल अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली, मुलांच्या जन्मानंतर त्याचे…

| Updated on: Jul 04, 2024 | 1:45 PM

उर्वशी ढोलकिया ही नेहमीच चर्चेत असते. उर्वशी ढोलकियाने मोठा काळ मालिकांमध्ये गाजवला आहे. उर्वशी ढोलकिया हिने नुकताच एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे करताना उर्वशी ढोलकिया ही दिसली आहे. आता याची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

घटस्फोटाबद्दल अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली, मुलांच्या जन्मानंतर त्याचे...
Urvashi Dholakia
Follow us on

उर्वशी ढोलकिया हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. उर्वशी ढोलकियाने मोठा काळ मालिकांमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे उर्वशी ढोलकिया सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते. उर्वशी ढोलकियाचे खासगी आयुष्य देखील कायमच चर्चेत राहिले आहे. उर्वशी ढोलकिया हिने काही वर्षांपूर्वीच पतीला घटस्फोट दिलाय. उर्वशी ढोलकिया ही मोठ्या संपत्तीची मालकीन आहे. उर्वशी ढोलकियाला दोन मुले आहेत. घटस्फोटानंतर उर्वशी ढोलकिया हिने दोन्ही मुलांचा सांभाळ एकटीनेच केलाय. नुकताच उर्वशी ढोलकिया हिने एक मुलाखत दिलीये.

मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे करताना उर्वशी ढोलकिया ही दिसली आहे. पहिल्यांदाच एक्स पती आणि घटस्फोटाबद्दल बोलताना उर्वशी ढोलकिया ही दिसली आहे. उर्वशी ढोलकिया म्हणाली की, माझा एक्स पती कुठे आहे हे देखील मला माहिती नाहीये. हेच नाही तर मुलांची संपूर्ण जबाबदारी मी एकटीच घेत आहे. त्याला काहीच देणे घेणे नाहीये.

मुळात म्हणजे माझ्या घटस्फोटाचे एक महत्वाचे कारण म्हणजे पुढच्या व्यक्तीला काही जबाबदारी घ्यायची नव्हती आणि मी कधीच जबाबदारीपासून दूर पळून गेले नाहीये. 6 व्या वर्षी मी स्वत:ला सांभाळले. लग्नानंतर समोरच्या व्यक्तीने कधीच जिम्मेदारी समले नाही. माझे दोन मुले होते, मी त्यांना कधीच एकटे सोडू शकत नव्हते. आम्ही प्लनिंग करूनच मुलांना जन्म दिला.

त्यानंतर काही दिवसांमध्येच समोरच्या व्यक्तीचे प्रेम संपले. खरे सांगायचे झाले तर मुळात म्हणजे माझ्यावर कोणीच खरे प्रेम केले नाही. आता पण कोणीच करत नाही. मी एक गोष्ट अगदी स्पष्टपणे सांगू इच्छिते की, आपले पालकच आपल्यावर खरे प्रेम करतात. राहिला विषय माझ्या पतीचा तर आता तो कुठे आहे हे देखील मला किंवा त्याच्या मुलांना माहिती नाहीये.

समोरच्या व्यक्तीने मला कधीच विचारले नाही की, माझे दोन्ही मुले कशी आहेत आणि काय करत आहेत. हेच नाही तर माझे मुले कधीच त्यांच्या वडिलांना देखील भेटले नाहीत. मी कितीतरी वेळा प्रयत्न केला मुलांना त्यांच्या वडिलांबद्दल सांगायचा पण त्यांनी त्यामध्ये काहीच रस दाखवला नाही. माझे मुले खूप जास्त समजदार आहेत आणि त्यांना माहिती आहे की, त्यांच्या मम्मीने काय काय केले आहे.