कुल्लू मनाली येथे फिरायला गेलेल्या अभिनेत्रीची कार दरीत कोसळल्याने दुर्दैवी मृत्यू, सेलिब्रिटींवर शोककळा

| Updated on: May 24, 2023 | 11:16 AM

टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. टीव्ही अभिनेत्रीचा कार अपघातात मृत्यूची बातमी कळताना अनेकांना धक्का बसला आहे.

कुल्लू मनाली येथे फिरायला गेलेल्या अभिनेत्रीची कार दरीत कोसळल्याने दुर्दैवी मृत्यू, सेलिब्रिटींवर शोककळा
Follow us on

मुंबई : टीव्ही इंडस्ट्रीतून एक दुःखद बातमी समोर येत आहे. लोकप्रिय ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ मालिकेतील अभिनेत्री वैभवी उपाध्याय ( Vaibhavi Upadhyaya Died ) आता या जगात नाही. अभिनेत्रीचा रस्ता अपघातात ( Actress Car Accident ) दुर्दैवी मृत्यू झालाय. अभिनेत्रीच्या आकस्मिक निधनाच्या बातमीने सेलिब्रिटींसह तिच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. आणखी एका अभिनेत्रीच्या निधनाचे टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. अभिनेत्री वैभवी उपाध्याय तिच्या होणाऱ्या पतीसोबत कारने प्रवास करत होती. तीर्थन व्हॅलीमध्ये फिरायला जात असताना गाडीचे नियंत्रण सुटल्याने गाडी दरीत कोसळली. ज्यामध्ये अभिनेत्रीचा मृत्यू झालाय.

फॉर्च्युनर कारला अपघात

या अपघातात जय सुरेश गांधी याला ही दुखापत झाली असून, त्यांच्यावर बंजार रुग्णालयात उपचार करण्यात आले. वैभवी जय सुरेश गांधी यांच्यासोबत फॉर्च्युनर कारने प्रवास करत होती. पण वाहनाचे नियंत्रण सुटल्याने गाडी 50 फूट खाली कोसळली.

वैभवी उपाध्यायचा मृत्यू

अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पण तोपर्यंत वैभवीचा मृत्यू झाला होता. जय सुरेश गांधी यांना यांना बंजार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा

टीव्ही अभिनेत्री रुपाली गांगुलीला ही बातमी कळताच मोठा धक्का बसला आहे. तिने तिच्या इंस्टाग्रामवर वैभवीचा एक रील व्हिडिओ देखील शेअर केला आहे. याशिवाय अनेक जण तिच्या मृत्यूवर शोक व्यक्त करत आहेत. प्रसिद्ध अभिनेते जेडी मजिठिया यांनीही वैभवीच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.