Video | अदा शर्मा हिने खरेदी केले सुशांत सिंह राजपूतचे घर? चक्क अभिनेत्याच्या फ्लॅटबाहेर दिसली अभिनेत्री

| Updated on: Aug 27, 2023 | 3:22 PM

अदा शर्मा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. अदा शर्मा हिला खरी ओळख ही द केरळ स्टोरी या चित्रपटापासून मिळालीये. अदा शर्मा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही देखील बघायला मिळते. अदा शर्मा हिच्याकडे सध्या बऱ्याच चित्रपटांच्या आॅफर देखील आहेत.

Video | अदा शर्मा हिने खरेदी केले सुशांत सिंह राजपूतचे घर? चक्क अभिनेत्याच्या फ्लॅटबाहेर दिसली अभिनेत्री
Follow us on

मुंबई : बाॅलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या निधनाला आता जवळपास तीन वर्षे झाली आहेत. सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. इतकेच नाही तर सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर अनेक गंभीर खुलासे देखील झाले. सुशांत सिंह राजपूत याचे निधन होऊन तीन वर्षे झाले असतानाही आरोप प्रत्यारोपाचे सत्र हे सातत्याने सुरू असल्याचेच बघायला मिळाले. सुशांत सिंह राजपूत याचे चाहते हे आताही सोशल मीडियावर न्यायाची मागणी करताना दिसतात. सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर कंगना राणावत (Kangana Ranaut) हिने देखील मोठे आरोप केले.

सुशांत सिंह राजपूत याच्या निधनाला तीन वर्षे जरी झाले असतील तरीही अजूनही सुशांत सिंह राजपूत याच्या मुंबईतील घरामध्ये कोणीच राहिला आलेले नाहीये. सुशांत सिंह राजपूत याचे ज्या घरात निधन झाले ते अजूनही खालीच आहे. ना तिथे किरायदार म्हणून कोणी राहिला येते नाही ते घर कोणी विकत घेण्याची हिंमत करते.

यामुळे त्या घराचा मालक त्रस्त आहे. सुशांत सिंह राजपूत याचे ज्या घरात निधन झाले आहे ते घर किरायाचे होते. सुशांत सिंह राजपूत याचे हे घर बांद्रा परिसरात आहे. सुशांत सिंह राजपूत याच्या निधनाच्या तीन वर्षांनंतर द केरळ स्टोरी चित्रपटाची अभिनेत्री अदा शर्मा ही या घरात राहण्यासाठी येणार असल्याची चर्चा सतत रंगत आहे.

विशेष म्हणजे नुकताच अदा शर्मा हिचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये अदा शर्मा ही सुशांत सिंह राजपूत याच्या घराच्या गॅलरीमध्ये दिसत आहे. सुशांत सिंह राजपूत याच्या घराच्याबाहेर पडल्यानंतर पापाराझी यांनी अदा शर्मा हिला हे घर खरेदी केले का हा प्रश्न विचारला. मात्र, यावर बोलणे अदा शर्मा हिने टाळले.

विशेष म्हणजे यावर अदा शर्मा हिने नकार देखील दिला नाही. यामुळेच आता जवळपास हे स्पष्ट आहे की, सुशांत सिंह राजपूत याचे घर अदा शर्मा ही खरेदी करत आहे आणि ती हे घर बघण्यासाठी आली होती. काही असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला सर्वांनाच सांगणार असल्याचे देखील अदा शर्मा हिने पापाराझी यांना म्हटले आहे.

द केरळ स्टोरी चित्रपटानंतर अदा शर्मा हिला एक वेगळी ओळख ही नक्कीच मिळालीये. द केरळ स्टोरी चित्रपटानंतर अदा शर्मा हिच्याकडे बऱ्याच आॅफर आल्या आहेत. यामुळेच अदा शर्मा ही गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये घराच्या शोधात होती. आता हे जवळपास निश्चित झाले आहे की, अदा शर्मा ही सुशांत सिंह राजपूत याचे घर खरेदी करत आहे.