मुंबई : ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) सिनेमाच्या यशानंतर अभिनेत्री अदा शर्मा आगामी प्रोजेक्टमुळे चर्चेत आली. ‘द केरळ स्टोरी’ सिनेमात अदा शर्मा हिने साकारलेल्या भूमिकेची देखील तुफान चर्चा रंगत असून अभिनेत्रीच्या अभिनयाचं सर्वच स्थरातून कौतुक होत आहे. ‘द केरळ स्टोरी’ सिनेमामुळे अदा हिच्या लोकप्रियतेत देखील प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे आगामी सिनेमात अभिनेत्री कोणत्या भूमिकेत दिसणार, सिनेमाचं नाव काय असणार, अदा हिच्यासोबत कोणता अभिनेता स्क्रिन शेअर करणार अशा अनेक चर्चा सध्या चाहत्यांमध्ये रंगत आहे. सध्या सर्वत्र अदा शर्मा हिच्या आगामी सिनेमाची चर्चा रंगत आहे. शिवाय अदा हिला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता देखील शिगेला पोहोचली आहे…
‘द केरळ स्टोरी’ सिनेमानंतर अभिनेत्री तुफान चर्चेत आली आहे. शिवाय आभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील वाढली आहे. अदा आता आगामी सिनेमात पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकणार आहे. गंधार फिल्म्स अँड स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेडच्या बॅनरखाली बनत असलेल्या विशाल पांडेच्या ‘द गेम ऑफ गिरटिग’ या सिनेमात अदा एका पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. या थ्रिलर सिनेमात अभिनेता श्रेयस तळपदे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
अदा शर्माच्या आगानी सिनेमाची कथा ‘ब्लू व्हेल गेम’वर आधारित आहे. काही वर्षांपूर्वी सर्वत्र ‘ब्लू व्हेल गेम’ची चर्चा होती. अनेक जण ‘ब्लू व्हेल गेम’च्या जाळ्यात अढकले होते. शिवाय ‘ब्लू व्हेल गेम’ चॅलेंजमुळे अनेकांचा मृत्यू देखील झाला होता. अदा शर्मा आणि श्रेयस तळपदे स्टारर ‘द गेम ऑफ गिरटिग’ सिनेमात सत्य घटनेवर आधारित असणार आहे.
आगामी सिनेमातील आपल्या भूमिकेबद्दल अदा शर्मा म्हणाली, ‘द गेम ऑफ गिरगिटमध्ये मी भोपाळमधील पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. सिनेमात मी ‘ब्लू व्हेल अॅप’च्या गेममुळे होणार नुकसान आणि त्या जाळ्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढताना दिसणार आहे… यापूर्वी देखील ‘कमांडो’ सिनेमात मी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती…’
‘द गेम ऑफ गिरटिग’ सिनेमाबद्दल श्रेयस म्हणाला, ‘सिनेमात मी अॅप डेव्हलपरची भूमिका करणार आहे. नव्या प्रवासासाठी उत्सुक आहे… सिनेमा लहान मुलं आणि तरुणांना फार आवडेल…’ सध्या सर्वत्र अदा शर्मा आणि श्रेयस तळपदे स्टारर ‘द गेम ऑफ गिरटिग’ सिनेमाची चर्चा रंगत आहे. सिनेमाबद्दलची उत्सुकता चाहत्यांच्या मनात शिगेला पोहोचली आहे.