The Kerala Story पहिल्या दिवशी कोट्यवधींची कमाई करण्याची शक्यता; ॲडव्हान्स बुकिंगमध्ये मारली बाजी!

| Updated on: May 05, 2023 | 3:27 PM

The Kerala Story पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कोटी रुपयांपर्यंत मारणार मजल? सर्वत्र सिनेमाच्या ॲडव्हान्स बुकिंगची चर्चा...

The Kerala Story पहिल्या दिवशी कोट्यवधींची कमाई करण्याची शक्यता; ॲडव्हान्स बुकिंगमध्ये मारली बाजी!
The Kerala Story
Follow us on

मुंबई : बॉलिवूडमध्ये आजपर्यंत अनेक असे सिनेमा साकारण्यात आले, जे प्रमोशनमुळे नाही तर, वादग्रस्त कारणांमुळे चर्चेत राहिले. अनेक वादग्रस्त कारणांमुळे सिमेमांची नेगेटिव्ह प्रसिद्धी झाली. पण त्यामुळे सिनेना मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग लाभला. प्रेक्षकांच्या मनात अशा सिनेमांनी घर केलं आणि बॉक्स ऑफिसवर वादग्रस्त परिस्थितीत सापडलेल्या सिनेमाने कोट्यवधी रुपयांची कमाई केली. फक्त भारतामध्ये नाही तर, परदेशात काही बॉलिवूड सिनेमांची चर्चा तुफान रंगली. अशाच काही सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) आणि ‘पठाण’ (Pathaan) हे उत्तम उदारण ठरतील. जो सिनेमा प्रदर्शनापूर्वी वादाच्या भोवऱ्यात अडकेल ते सिनेमे बॉक्स ऑफिसवप सुपरहीट ठरेल… असं काही समीकरण सध्या तयार झालं आहे… असं म्हणायला हरकत नाही.

सध्या ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) या सिनेमाबाबत सर्वत्र चर्चा रंगल्या आहेत. सिनेमा ५ मे २०२३ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. सिनेमाने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये बाजी मारल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. दिग्दर्शक सुदिप्तो सेन (Sudipto Sen) दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाची निर्मिती विपुल अमृतलाल शाह यांनी केली आहे.

सिनेमात अदाह शर्मा (Adah Sharma), योगिता बिहानी (Yogita Bihani), सोनिया बलानी (Sonia Balani) आणि सिद्धी इदनानी (Siddhi Idnani) मुख्य भूमिकेत दिसत आहेत. रिपोर्टनुसार ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाने पीव्हीआर (PVR), आइनॉक्स (Inox) आणि सिनेपोलिस (Cinepolis) या तीन राष्ट्रीय मल्टिप्लेक्समध्ये एकूण 32 हजार तिकिटांची विक्री केली आहे. ‘द केरळ स्टोरी’सारख्या सिनेमासाठी ही मोठी गोष्ट आहे.

हे सुद्धा वाचा

इंडस्ट्री ट्रॅकर Sacnilk नुसार, 5 मे 2023 रोजी पहाटे 4 वाजेपर्यंत, ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाने पहिल्या दिवशी एकूण 60 हजार तिकिटांची विक्री केली. ज्याची किंमत सुमारे 1.25 कोटी रुपये आहे. या ट्रेंडनुसार पहिल्या दिवसाची कमाई सहा ते सात कोटी असू शकते. ‘द काश्मीर फाइल्स’ सिनेमाची पहिल्या दिवसाची कमाई 3.5 कोटी होती, तर जगभरात सिनेमाने 340 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला होता. ‘द काश्मीर फाइल्स’ सिनेमानंतर ‘द केरळ स्टोरी’ किती रुपयांचा गल्ला जमा याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नक्की काय आहे ‘द केरळ स्टोरी’ ?
‘द केरळ स्टोरी’ सिनेमा त्या अहवालांवर आधारित आहे ज्यानुसार केरळमधील सुमारे 32 हजार महिलांना बळजबरीने इस्लाममध्ये धर्मांतरित करण्यात आलं आणि अनेकांना ISIS अंतर्गत सीरियात नेण्यात आलं. सिनेमाचे निर्माते म्हणतात की हा सिनेमा सत्य घटनांवर आधारित आहे आणि त्यामुळे तो अनेक वादांनी घेरला आहे…. सध्या सर्वत्र ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाची चर्चा रंगत आहे.