सुशांत सिंह राजपूत याचं घर खरेदी करणार अदा शर्मा? अभिनेत्रीने अखेर मौन सोडलंच

| Updated on: Apr 06, 2024 | 8:12 AM

Adaha Sharma | ज्या घरात सुंशातने संपवले स्वतःचे प्राण तेच घर खरेदी करणार अदा शर्मा? मोठं वक्तव्य करत अभिनेत्रीने सांगितलं सत्य... गेल्या अनेक दिवसांपासून अदा शर्मा तिच्या संपत्तीमुळे चर्चेत आहे. अनेकदा अभिनेत्रीला सुंशात याच्या घराबाहेर देखील स्पॉट करण्यात आलं आहे.

सुशांत सिंह राजपूत याचं घर खरेदी करणार अदा शर्मा? अभिनेत्रीने अखेर मौन सोडलंच
Follow us on

अभिनेत्री अदा शर्मा गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेत्री नवीन घर करणार असल्याची चर्चांनी जोर धरला आहे. अदा अभिनेता सुशांत सिंह राजपूत ज्या घरात राहत होता ते घर खरेदी करणार असल्याची माहिती समोर येत आहे. ज्या घरात दिवगंत अभिनेता सुशांत याने स्वतःचे प्राण संपवले ते घर अदा खरेदी करणार असल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. अनेकदा यावर अदा हिला विचारण्यात देखील आलं होतं. पण योग्य वेळ आल्यानंतर उत्तर देईल असं वक्तव्य अदा हिने दिलं होतं. आता नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अदा हिने यावर मौन सोडलं आहे.

नुकताच झालेल्या मुलाखतीत सुशांत याचं घर खरेदी करणार का? यावर अदा म्हणाली, ‘सध्या मला फक्त एवढंच बोलायला आवडेल की, मला फक्त आणि फक्त लोकांच्या मनात राहायचं आहे. बोलण्याची एक योग्य वेळ असते. जेव्हा मी जागा पाहण्यासाठी गेली होती, तेव्हा माध्यमांना पाहून मी भावनिक झाली. मझ्या सिनेमांमुळे मला चाहत्यांच्या मनात राहायचं आहे. माझ्या खासगी आयुष्यामुळे नाही… ‘

पुढे भावना व्यक्त करताना, अभिनेत्रीने सुशांत सिंग राजपूतच्या अपार्टमेंट विकल्याबद्दल ऑनलाइन केलेल्या नकारात्मक टिप्पण्यांबद्दल तिची निराशा बोलून दाखवली. ‘एका अशा व्यक्तीबद्दल वाईट बोलणं अत्यंत लाजिरवाणं आहे, जो आपल्यात नाही. विशेषतः सुशांत याच्याबद्दल. त्याने अनेक सिनेमांमध्ये स्वतःचं अमुल्य योगदान दिलं आहे…’

‘मी माझ्यावर होत असलेल्या टीकेचा सामना करु शकते. पण जेव्हा जी लोकं स्वतःचा बचाव करु शकत नाहीत त्यांच्याबद्दल बोलणं वाईट आहे. प्रॉपर्टीच्या विषयावर योग्य वेळ आल्यानंतर मी बोलेल. सध्या कोणतंही भाडं न देता मी अनेकांच्या हृदयात राहते… ही गोष्ट मला आनंद देणारी आहे…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अदा शर्मा हिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

अदा शर्मा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘द केरळ स्टोरी’ सिनेमामुळे अदा शर्मा हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर देखील तगडी कमाई केली. सिनेमामुळे अदा हिच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीमध्ये मोठी वाढ झाली. सोशल मीडियावर देखील अदा कायम सक्रिय असते.

सोशल मीडियावर देखील अदा हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.