मुंबई : राखी सावंत ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. राखी सावंत ही बिग बाॅस (Bigg Boss) मराठीमधून बाहेर आल्यानंतर तिने सर्वांनाच मोठा धक्का देत सोशल मीडियावर आपल्या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडीओ हे शेअर केले. राखी सावंत हिने आदिल दुर्रानी नावाच्या व्यक्तीसोबत लग्न केले. अगोदर कोर्टात लग्न केले आणि मग थेट निकाह केला. लग्नानंतर राखी सावंत (Rakhi Sawant) हिने इस्लाम धर्म देखील स्वीकारला. लग्नानंतर आपले नाव फातिमा आदिल दुर्रानी असल्याचे राखी सावंत हिने जाहीर केले.
लग्न झाल्यानंतर काही दिवस सर्व गोष्टी व्यवस्थित राखी सावंत हिच्या सुरू होत्या. मात्र, त्यानंतर राखी सावंत हिने आदिल दुर्रानी याच्यावर अत्यंत गंभीर आरोप हे केले. आदिल दुर्रानी आणि राखी सावंत याच्यामधील वाद थेट पोलिस ठाण्यात पोहचला. त्यानंतर आदिल दुर्रानी याच्यावर बरेच महिने थेट जेलमध्ये राहण्याची वेळ देखील आली.
राखी सावंत हिने आदिल दुर्रानी याच्यावर अनेक गंभीर आरोप केले. फसवणूक केल्याचा देखील राखीने आदिल दुर्रानीवर आरोप केला. राखी सावंत हिने आदिल दुर्रानी याच्यावर केलेले आरोप ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला. आदिल दुर्रानी याचे बाहेर एका मुलीसोबत अनैतिक संबंध असल्याचे देखील राखी सावंत हिने म्हटले.
पापाराझी यांच्यासमोर नेहमीच राखी सावंत ही आदिल दुर्रानी याच्यावर आरोप करताना दिसली. आता आदिल दुर्रानी हा जेलच्या बाहेर आलाय. नुकताच पापाराझी यांनी आदिल दुर्रानी याला स्पाॅट केले. यावेळी आदिल दुर्रानी याने मोठा खुलासा देखील केला आहे. आपली बाजू लवकरच मांडणार असल्याचे देखील आदिल दुर्रानी याने स्पष्ट केले.
आदिल दुर्रानी म्हणाला की, मी आता लवकरच प्रेस घेणार आहे. त्यामध्ये मी माझी बाजू मांडणार आहे. मला कोणाला करोडो रूपये द्यायचे आहेत की, मला कोणाकडून येणार आहेत हे सर्व मी आता सांगेल. मी सर्व काही सांगणार आहे काय काय झाले आणि कसे कसे झाले. मी सर्व काही सांगणार आहे.
राखी सावंत हिच्यासोबत अजून कोण कोण या गोष्टींमध्ये सहभागी होते, त्यांची नावे देखील मी जाहीर करणार आहे. मुळात म्हणजे माझ्यासोबत खूप जास्त चुकीच्या गोष्टी घडल्या आहेत, त्यावर देखील मी बोलेल. आता हे स्पष्ट आहे की, आदिल दुर्रानी हा देखील राखी सावंत हिची पोलखोल करू शकतो.
काही दिवसांपूर्वीच राखी सावंत हिने स्पष्ट केले की, आता आदिल दुर्रानी हा लवकर जेलबाहेर यावा. कारण मला त्याच्यासोबत घटस्फोट घ्यायचा आहे. माझ्या आयुष्यात खूप जास्त काम आहे आणि त्यासाठी मला चांगल्या जीवनसाथीची गरज आहे. आता हे स्पष्ट झाले आहे की, राखी सावंत ही आदिल दुर्रानी याच्यासोबत घटस्फोट घेण्यास तयार आहे.