Adipurush | अखेर ‘आदिपुरुष’मधील डायलॉग बदलला; ‘बाप’च्या जागी वापरला ‘हा’ शब्द, पहा व्हिडीओ

| Updated on: Jun 22, 2023 | 9:02 AM

एका मुलाखतीत या चित्रपटाचे संवादलेखक मनोज मुंतशीर यांना डायलॉग्सवरून प्रश्न विचारण्यात आला होता. “तुम्ही जाणूनबुजून असे डायलॉग्स लिहिले आहेत का”, असं विचारलं असता त्यावर त्यांनी होकारार्थी उत्तर दिलं होतं.

Adipurush | अखेर आदिपुरुषमधील डायलॉग बदलला; बापच्या जागी वापरला हा शब्द, पहा व्हिडीओ
Hanuman in Adipurush movie
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटातील विविध गोष्टींवर प्रेक्षक-समिक्षकांनी आक्षेप घेतला आहे. मात्र त्यापैकी सर्वांत वादग्रस्त ठरलेली बाब म्हणजे या चित्रपटातील डायलॉग्स. रामायणसारख्या महाकाव्यावर आधारित चित्रपटात हनुमानाच्या तोंडी असे डायलॉग्स कसे देऊ शकतात, असा सवाल अनेकांनी निर्मात्यांना केला. त्यानंतर दिग्दर्शिक ओम राऊत आणि निर्माते टी-सीरिज यांनी चित्रपटातील आक्षेपार्ह संवाद बदलण्याचं जाहीर केलं होतं. आदिपुरुष प्रदर्शित झाल्याच्या सहा दिवसांतच त्यातील डायलॉग्स बदलण्यात आले आहेत. नव्या डायलॉग्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘आदिपुरुष’मध्ये हनुमानाच्या एका संवादावर सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त झाली होती. ‘कपडा तेरे बाप का, तेल तेरे बाप का, आग भी तेरे बाप की, और जलेगी भी तेरे बाप की’, असा हा डायलॉग आहे. या संवादात आता बदल करण्यात आला आहे. या नव्या डायलॉगमध्ये ‘बाप’ या शब्दाऐवजी ‘लंका’ असा शब्द वापरण्यात आला आहे. ‘कपडा तेरी लंका का, तेल तेरी लंका का, आग भी तेरी लंका की, और जलेगी भी तेरी लंका की’, असा हा नवीन डायलॉग आहे.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

एका मुलाखतीत या चित्रपटाचे संवादलेखक मनोज मुंतशीर यांना डायलॉग्सवरून प्रश्न विचारण्यात आला होता. “तुम्ही जाणूनबुजून असे डायलॉग्स लिहिले आहेत का”, असं विचारलं असता त्यावर त्यांनी होकारार्थी उत्तर दिलं होतं. “अत्यंत सूक्ष्म विचारप्रक्रियेतनंतरच बजरंग बली आणि सर्व पात्रांसाठी डायलॉग लिहिण्यात आले आहेत. आम्ही जाणूनबुजून ते डायलॉग सोप्या भाषेत लिहिले आहेत. कारण आपल्याला एक गोष्ट समजून घेणं आवश्यक आहे की जर चित्रपटात अनेक पात्रं असतील तर प्रत्येकाची भाषा एकाच प्रकारची असू शकत नाही. प्रत्येक पात्राच्या भाषेत विविधता आणावी लागते”, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं होतं.

“आपल्याकडे जेव्हा आजी रामायणाची कथा सांगायची, तेव्हा त्या अशाच भाषेत सांगायच्या. ज्या डायलॉगचा तुम्ही उल्लेख केला, या देशाचे संत, मोठमोठे कथावाचक अशाच भाषेत बोलतात. अशा पद्धतीचे डायलॉग लिहिणारी मी पहिलीच व्यक्ती नाही. असे संवाद आधीपासूनच आपल्याकडे आहेत”, असं ते म्हणाले होते.

‘आदिपुरुष’ या चित्रपटाची कथा रामायणावर आधारित आहे. यामध्ये अभिनेता प्रभासने राघव, क्रिती सनॉनने जानकी, सनी सिंहने शेष, सैफ अली खानने लंकेश आणि देवदत्त नागेनं बजरंग बलीची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट हिंदीसोबतच तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि तमिळ भाषेतही प्रदर्शित झाला आहे.