Adipurush | ओम राऊतने 15 दिवसांत सुधारल्या ‘आदिपुरुष’मधील या 5 मोठ्या चुका; चित्रपट ठरणार हिट?

| Updated on: May 03, 2023 | 4:00 PM

हा चित्रपट 12 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याच्यावर जोरदार टीका झाली होती. टीझरमधील VFX वरून नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली होती.

Adipurush | ओम राऊतने 15 दिवसांत सुधारल्या आदिपुरुषमधील या 5 मोठ्या चुका; चित्रपट ठरणार हिट?
Adipurush
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचा टीझर आणि पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा आहे. रामायणावर आधारित या चित्रपटात प्रभासने राम, क्रिती सनॉनने सीता तर सैफ अली खानने रावणाची भूमिका साकारली आहे. मात्र चित्रपटातील त्यांच्या लूकवरून आणि व्हीएफएक्सवरून नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. राजकीय वर्तुळातही आदिपुरुष चित्रपटाचा मुद्दा पेटला होता. त्यानंतर निर्माते-दिग्दर्शकांनी अपेक्षित बदल करण्यासाठी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली. गेल्या 15 दिवसांत या चित्रपटाचे काही पोस्टर्स प्रेक्षकांच्या भेटीला आले. त्यात दिग्दर्शकांनी पाच मोठ्या चुका सुधारल्याचं दिसल्याने प्रेक्षकांनी समाधान व्यक्त केलं आहे.

आदिपुरुषच्या पहिल्या पोस्टरमध्ये श्रीरामाची भूमिका साकारणाऱ्या प्रभासला जानवंशिवाय दाखवण्यात आलं होतं. त्यावरून नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. काहींनी त्याविरोधात निदर्शनंसुद्धा केली होती. इतकंच नव्हे तर मुंबई आणि इंदौरसारख्या शहरांमध्ये निर्मात्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली होती. आता ट्रेलरमध्ये प्रभासने जानवं परिधान केल्याचं पहायला मिळत आहे.

हे सुद्धा वाचा

या चित्रपटातील सैफ अली खानच्या लूकवरून मोठा वाद निर्माण झाला होता. आदिपुरुषमध्ये सैफ रावणाच्या भूमिकेत आहे. त्याची केशरचना आणि लूक पाहून नेटकऱ्यांनी सैफची तुलना मुघलांशी केली होती. आता त्यातही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या नवीन पोस्टरमध्ये कृती सनॉनच्या लूकमध्येही बदल केला आहे. सीतेची भूमिका साकारणाऱ्या क्रितीच्या भांगेत सिंदूर का नाही, असा सवाल नेटकऱ्यांनी केला होता. त्यामुळे सीता नवमी रोजी प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये क्रितीच्या भांगेत सिंदूर दाखवलं गेलंय.

याशिवाय आदिपुरुषच्या सीजीआय आणि वीएफएक्समध्येही बरेच बदल करण्यात आले आहेत. ट्रेलरमधील वीएफएक्स हे आधीपेक्षा चांगले असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलंय. हा चित्रपट 12 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याच्यावर जोरदार टीका झाली होती. टीझरमधील VFX वरून नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली होती. त्यानंतर चित्रपटाच्या टीमने व्हिएफएक्सवर आणखी मेहनत घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे येत्या 16 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

“त्या पाच – सहा महिन्यांचा कालावधी मिळणे ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आव्हानं प्रत्येक गोष्टीत असतात. पण ही आव्हानं आमच्या चित्रपटाला अधिक चांगला आणि मजबूत बनवेल. आम्ही अशा तंत्रज्ञानाचा उपयोग केला आहे जो मार्व्हल, डीसी, अवतार यांसारख्या हॉलिवूड चित्रपटांमध्ये दाखवला गेला”, असं ओम राऊतने स्पष्ट केलं.