मुंबई : ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून तो वादात सापडला आहे. आता रामनवमीच्या मुहूर्तावर या चित्रपटाचा नवीन पोस्टर प्रदर्शित करण्यात आला. यामध्ये अभिनेता प्रभास रामाच्या भूमिकेत तर अभिनेत्री कृती सनॉन सीतेच्या भूमिकेत पहायला मिळतेय. सनी सिंहने लक्ष्मणाची भूमिका साकारली आहे तर देवदत्त नागे हनुमानाच्या भूमिकेत आहे. आदिपुरुषच्या टीझरवरून मोठा वाद निर्माण झाला होता. ज्यानंतर निर्माते-दिग्दर्शकांनी चित्रपटात बदल करण्यासाठी प्रदर्शनाची तारीख सहा महिने पुढे ढकलली. त्यानंतर आता पुन्हा एकदा नव्या पोस्टरवर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. निर्मात्यांनी त्यातील भूमिकांच्या लूकमध्ये कोणतेच बदल केले नाहीत, असं नेटकरी म्हणतायत.
‘आदिपुरुष’चा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील कलाकारांचे लूक पाहून नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. या चित्रपटात अभिनेता सैफ अली खानने रावणाची भूमिका साकारली आहे. त्याच्याही लूकवर नेटकऱ्यांनी आक्षेप घेतला होता. सैफ अली खानच्या दाढीची तुलना नेटकऱ्यांनी मुघलांशी केली होती. हा वाद नंतर इतका वाढला की निर्मात्यांना प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलावी लागली. चित्रपटात काही बदल करणार असल्याचंही दिग्दर्शक ओम राऊत म्हणाले होते. मात्र नव्या पोस्टरमध्ये कलाकारांचे पुन्हा जुनेच लूक पाहून नेटकरी भडकले आहेत.
रामनवमीनिमित्त या चित्रपटाचा नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आणला. हा पोस्टर पाहताच नेटकऱ्यांनी त्यातील चुका शोधण्यास सुरुवात केली. अनेकांनी हनुमान, राम, सीता आणि लक्ष्मणाच्या लूकवर आक्षेप घेतला आहे. सैफ अली खाननंतर आता कृती सनॉनच्या लूकवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. सीता मातेच्या भांगेत सिंदूर का दाखवला नाही, असा सवाल काही नेटकऱ्यांनी केला आहे.
Sindoor hi gayab kar diya
biswas nahi ho raha iss sab me @manojmuntashir bhi shamil hai #Adipurush#BoycottAdipurush pic.twitter.com/JIpNrkltcg— Surya Yadav (@surya_yadav63) March 31, 2023
What’s changed now? Why these people are praising the same stuff they criticized couple of months back? I don’t see any change in any character’s attire. Hope at least Ravanuddin became Ravanaasura now.#Adipurush https://t.co/OKyPny0kpB
— శ్రీ (@sree_n_r) March 31, 2023
Sindoor kaise bhul sakte ho bhai#Adipurush pic.twitter.com/FAspeUbHur
— Surya Yadav (@surya_yadav63) March 31, 2023
In the movie #Adipurush, the #BadmashBollywood is showing Hanuman ji with beard but without moustache like Muslims. They are showing Shri Ram with Moustache & Sri Laxman with both. This is contrary to the discription in our sastras. Also they will be justifying Ravan kidnapping… pic.twitter.com/LPp58AFLd1
— Radharamn Das राधारमण दास (@RadharamnDas) March 31, 2023
kam se kam ye look to degiye @omraut sir please . aap 21 vi sadi me aisa mt kariye plz ???#JaiShreeRam #HappySriRamaNavami #RamNavami #Adipurush pic.twitter.com/TsyjKAuTZH
— Deepak (@payalarmy_love) March 30, 2023
‘कलाकारांवर कोणताच राग नाही, कारण त्यांची काही चूक नाही. पण हा पोस्टरसुद्धा मनाला भावत नाही’, असं एकाने लिहिलं. तर ‘प्रभासने हा प्रोजेक्ट सोडून द्यावा’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘संस्कृती मस्करी का करताय’, असा संतप्त सवालही नेटकऱ्यांनी केला आहे. आदिपुरुषच्या पोस्टरचं एडिटिंग नेटकऱ्यांना अजिबात आवडलं नाही. त्यावरूनच अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
आदिपुरुष हा चित्रपट 12 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याच्यावर जोरदार टीका झाली होती. टीझरमधील VFX वरून नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली होती. त्यानंतर चित्रपटाच्या टीमने व्हिएफएक्सवर आणखी मेहनत घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे येत्या 16 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये प्रभास, क्रिती सनॉन, सनी सिंग, सैफ अली खान यांच्या भूमिका आहेत.