मुंबई : ज्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते, अखेर तो चित्रपट आज (16 जून) प्रदर्शित झाला. ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे ‘आदिपुरुष’ची ॲडव्हान्स बुकिंगसुद्धा दमदार झाल्याचं पहायला मिळालं. फर्स्ट डे फर्स्ट शोसाठी प्रेक्षकांनी चांगलीच गर्दी केली आहे. आता ट्विटरवर या चित्रपटातील विविध सीन्स व्हायरल होत आहेत. त्यापैकी प्रभासच्या एण्ट्रीच्या सीनने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. प्रभासच्या एण्ट्रीवर थिएटरमध्ये ‘जय श्रीराम’च्या घोषणा होऊ लागल्या आहेत.
ट्विटरवर आदिपुरुषबद्दल प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया समोर येत आहेत. सोशल मीडियावर या चित्रपटाती खूप क्रेझ पहायला मिळतेय. प्रभासची एण्ट्री हा अंगावर रोमांच उभा करणारा आहे, असं अनेकांनी म्हटलंय. त्याचा व्हिडीओ काहींनी ट्विटरवर शेअर केला आहे. तर चित्रपट पाहिल्यानंतर थिएटरमधून बाहेर पडणारे प्रेक्षक ‘जय श्रीराम’च्या घोषणा देताना दिसत आहेत.
#Prabhas entry in #Adipurush #jaisriram pic.twitter.com/jdryqAoOeQ
— Jr NTR (@raavan1488) June 16, 2023
प्रेक्षकांच्या मते ‘बाहुबली’ या चित्रपटाला जरा प्रतिसाद मिळाला, तसाच आता ‘आदिपुरुष’ला मिळू शकतो. या चित्रपटाचं पार्श्वसंगीतसुद्धा अनेकांच्या पसंतीस पडत आहे. मात्र व्हिएफएक्सवर काहींनी नाराजी व्यक्त केली आहे. आदिपुरुषमधील व्हीएफएक्स आणखी चांगलं केलं जाऊ शकलं असतं, असं मत काही युजर्सनी नोंदवलं आहे.
Hanuman unna prathi scene ❤️???#Adipurush #AdipurushReview #AdipurushTickets #AdipurushBookings #AdipurushCelebrations #Prabhas? pic.twitter.com/tyDgg78EIx
— Surendra S.N (@SChakail) June 16, 2023
रामायणाच्या कथेवर आधारित या चित्रपटात प्रभासने राघव, क्रिती सनॉनने जानकी, सनी सिंहने लक्ष्मण, सैफ अली खानने लंकेश आणि देवदत्त नागेनं बजरंगची भूमिका साकारली आहे. यामध्ये मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित शूर्पणखाच्या भूमिकेत आहे. तर कैकेयीची भूमिका सोनाली खरेनं साकारली आहे. विशेष म्हणजे प्रभासने रामासोबतच दशरथ यांचीही भूमिका साकारली आहे.
#Adipurush
Is an very good movie with okish vfx.. Screen presence of lead character were too good nothing flaws.. Om direction superb some scene vfx were outstanding dnt belive any rumours.. Om presented really well good and watch.. Some scenes were disappoint but not the movie pic.twitter.com/1UeRDqKXq9— Janasena abimani (@Rebelsuraj7) June 16, 2023
गेल्या वर्षी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. मात्र व्हिएफएक्स आणि कलाकारांच्या लूकवरून नकारात्मक प्रतिक्रियांचा पाऊस पडला. ‘आदिपुरुष’चा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील कलाकारांचे लूक पाहून नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. टीझरमधील रावणाच्या लूकवर नेटकऱ्यांनी आक्षेप घेतला होता. सैफ अली खानच्या दाढीची तुलना नेटकऱ्यांनी मुघलांशी केली होती. हा वाद नंतर इतका वाढला की निर्मात्यांना प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलावी लागली होती.