मुंबई : बाॅलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur) हा कायमच चर्चेत असतो. आदित्य रॉय कपूर याला खरी ओळख ही आशिकी 2 चित्रपटामुळेच भेटली. या चित्रपटाने धमाका केला, चित्रपटाला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिले. गेल्या काही दिवसांपासून आदित्य रॉय कपूर हा त्याच्या चित्रपटांपेक्षाही अधिक त्याच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. आदित्य रॉय कपूर हा अनन्या पांडे (Ananya Pandey) हिला डेट करत असल्याची जोरदार चर्चा आहे.
आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे हे अनेकदा एकसोबत स्पाॅट झाले. इतकेच नाही तर काही दिवसांपूर्वीच विदेशात खास वेळ घालवताना आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे दिसले. मात्र, अजूनही आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे यांनी त्यांच्या रिलेशनवर काही भाष्य केले नाही. आदित्य रॉय कपूर हा कायमच सोशल मीडियावर सक्रिय असतो.
सध्या आदित्य रॉय कपूर याचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. आदित्य रॉय कपूर याचा हा व्हिडीओ त्याच्या चाहत्यांना जबरदस्त आवडल्याचे दिसतंय. लोक या व्हिडीओनंतर आदित्य रॉय कपूर याचे काैतुक करताना दिसत आहेत. आदित्य रॉय कपूर याला रियल स्टार देखील अनेकांनी म्हटले आहे.
त्याचे झाले असे की, आदित्य रॉय कपूर हा एक कार्यक्रमातून बाहेर पडला. यावेळी आदित्य रॉय कपूर याला पाहून चाहत्यांनी अत्यंत मोठी गर्दी केली. आदित्य रॉय कपूर याला गर्दीतून काढण्यासाठी चाहत्यांना धक्काबुक्की करताना काही सिक्योरिटी गार्ड दिसले. हा प्रकार लक्षात येताच आदित्य रॉय कपूर याने त्यांना थांबवले.
पुढे आदित्य रॉय कपूर हा म्हणताना दिसतोय की, धक्काबुक्की अजिबात नाही. त्यांना लागू शकते. पुढे थेट आदित्य रॉय कपूर हा एका सिक्योरिटी गार्डचा हात पकडताना देखील दिसतोय. यानंतर चाहत्यांनी मोठी गर्दी त्याच्याभोवती केली. चाहत्यांच्या गर्दीमधून निघणे देखील आदित्य रॉय कपूर याला अवघड झाल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.
काही महिला चाहत्या या आदित्य रॉय कपूर याच्यासोबत सेल्फी घेताना दिसत आहेत. यानंतर आदित्य रॉय कपूर हाच गर्दीतून मार्ग काढत निघून जाताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून लोक आदित्य रॉय कपूर याचे काैतुक करताना दिसत आहेत. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करत थेट म्हटले की, आदित्य रॉय कपूर याच्याकडून इतर स्टारने काही गोष्टी शिकायला हव्यात.