शाहरुख खान याच्या जवान चित्रपटाला साऊथच्या ‘या’ चित्रपटाने दिली अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये मोठी मात, किंग खानला मोठा धक्का

| Updated on: Aug 30, 2023 | 5:01 PM

बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान याच्या आगामी जवान या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठे क्रेझ हे बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे शाहरुख खान हा देखील या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. शाहरुख खान याने काही दिवसांपूर्वीच चाहत्यांसाठी खास सेशनचे आयोजन केले होते.

शाहरुख खान याच्या जवान चित्रपटाला साऊथच्या या चित्रपटाने दिली अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये मोठी मात, किंग खानला मोठा धक्का
Follow us on

मुंबई : बाॅलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा जवान हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला 7 सप्टेंबर रोजी येतोय. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना शाहरुख खान हा दिसतोय. विशेष म्हणजे यापूर्वी काही महिन्यांपूर्वीच शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट (Movie) रिलीज झाला. या चित्रपटाने रेकाॅर्ड ब्रेक कामगिरी करत शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. शाहरुख खान याला त्याच्या आगामी जवान (Jawan) चित्रपटाकडून देखील मोठ्या अपेक्षा या नक्कीच आहेत.

हा चित्रपट धमाकेदार कामगिरी करणार असल्याचे सांगितले जात आहे. शाहरुख खान याच्या जवान चित्रपटाच्या रस्ता नक्कीच सोपा नसणार आहे. कारण शाहरुख खान याच्या जवान चित्रपटाला तगडी टक्कर देताना प्रभास याचा सालार हा चित्रपट दिसणार आहे. प्रभासचा हा चित्रपट 28 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे.

विशेष म्हणजे या दोन्ही चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळत आहे. रिपोर्टनुसार अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये प्रभासच्या सालार चित्रपटाने शाहरुख खान याच्या जवान चित्रपटाला मात दिलीये. विदेशात जवान चित्रपटाचे आणि सालार चित्रपटाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. यामध्ये जवान चित्रपटापेक्षा सालार वरचढ ठरताना नक्कीच दिसतोय. भारतामध्येही जवान चित्रपटाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये सुरू झाले आहे.

नुकताच आलेल्या रिपोर्टनुसार शाहरुख खान याच्या जवान चित्रपटाने विदेशातील अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून 1.65 कोटी रूपये कमावले आहेत. दुसरीकडे प्रभास याच्या सालार चित्रपटाने अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून 3.3 कोटींचे कलेक्शन करून मोठा धमाका करण्यास सुरूवात केलीये. विशेष म्हणजे सालार चित्रपटाचे सध्या जोरदार प्रमोशन केले जात आहे.

एकाप्रकारे अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून प्रभास याने शाहरुख खान याला मोठा धक्काच दिलाय. विशेष म्हणजे सालार या चित्रपटाच्या रिलीजला जवळपास एक महिना शिल्लक असतानाच हा चित्रपट अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये मोठी कामगिरी करताना दिसत आहे. प्रभासच्या चाहत्यांमध्येही मोठा उत्साह हा बघायला मिळतो.

शाहरुख खान हा देखील जवान चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. जवान चित्रपटाची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ आहे. सालार आणि जवान चित्रपटांपैकी नेमका कोणता चित्रपट सुपरहिट ठरतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे. काही दिवसांपूर्वीच प्रभास याचा आदिपुरूष हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाला काही खास धमाका करण्यात यश मिळाले नाही. प्रभास याचा आदिपुरूष फ्लाॅप गेला.